शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

नगराध्यक्षपदासाठी रस्सीखेच सुरू

By admin | Updated: July 12, 2014 00:15 IST

बुलडाणा जिल्ह्यातील ९ नगरपालिकेत २३ अर्ज

बुलडाणा : जिल्ह्यातील ९ नगरपालिकेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक येत्या १७ जुलै रोजी होणार आहे. या निवडणुकीसाठी अर्ज सादर करण्याच्या आज ११ जुलै रोजी शेवटच्या एकूण २३ उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले. त्यामुळे नगरपालिकेचे राजकीय वातावरण तापले असून विविध राजकीय पक्षात रस्सीखेच सुरू झाली आहे.बुलडाणा नगरपालिकेसाठी राष्ट्रवादी पक्षाचे टि.डी.अंभोरे पाटील यांनी ४ अर्ज तर मो.सज्जाद खान यांनी २ अर्ज दाखल केले आहेत. मेहकर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष व उपाध्यक्ष पदासाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसच्या हसिना कासम गवळी व रंजना संजय म्हस्के यांनी प्रत्येकी दोन अर्ज सादर केले आहे. दोन्ही उमेदवार काँग्रेसचे असल्यामुळे काँग्रेसमधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे.चिखली नगरपालिकेच्या अध्यक्षपदासाठी काँग्रेसकडून शोभाताई सवडतकर तर भाजपाकडून पंडीतराव देशमुख यांनी अर्ज सादर केले. नांदुरा येथे अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी दोन उमेदवारी अर्ज दाखल आहे. यामध्ये भाजपाच्या पुष्पा लक्ष्मण झांबरे व सविता राजेश एकडे यांचा आहे. मलकापूर येथे नगराध्यक्ष पदाकरिता ३ अर्ज दाखल झाले आहेत. यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या हमीदाबी शे.मलंग, ज्योती विलास निमकर्डे, मंगला श्रीकृष्ण पाटील यांचा समावेश आहे.जळगाव जामोद येथे नगर परिषद नगराध्यक्ष निवडणुकीसाठी दोन उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यापैकी एका उमेदवाराने तीन तर एकाने एक अर्ज दाखल केला.भाजपा शिवसेना युतीच्या वतीने भाजपाचे रामदास बंबटकार यांनी आज तीन उमेदवारी अर्ज दाखल केले.