शहरं
Join us  
Trending Stories
1
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
2
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
5
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
6
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
7
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
8
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
9
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
10
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही
11
होत्याचं नव्हतं झालं..!! विमान अपघातात जोडप्याचा मृत्यू; भावाला शेवटचा फोन, म्हणाले होते...
12
Nagpur Murder: गुटखा न देण्यावरून पेटला वाद, रागाच्या भरात मित्रालाच संपवलं, दोघांना अटक!
13
Finn Allen: अवघ्या ४९ चेंडूत १५० धावा! फिन अ‍ॅलेननं इतिहास रचला, ख्रिस गेलचाही विक्रम मोडला 
14
पहिल्या कारपासून ते प्रवासाच्या तारखेपर्यंत... विजय रुपानींसाठी '१२०६' लकी नंबर ठरला दुर्दैवी
15
Ahmedabad Plane Crash : महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांवर कोसळले ‘दुःखाचे आकाश’
16
Ahmedabad Plane Crash :विद्यार्थी जेवण करत होते अन् अंगावर पडले विमान 
17
Ahmedabad Plane Crash : ...तर वाचला असता यशा, रुद्र अन् रक्षा यांचा जीव
18
विमान थोडे पुढे गेले असते तर साबरमती नदीत उतरवले असते...
19
इस्राइलकडून इराणवर मोठा हवाई हल्ला, तेहरानवर डागली क्षेपणास्त्रे आणि ड्रोन 
20
Sunjay Kapur Death: करिश्मा कपूरचा Ex पती संजय कपूर यांचं निधन, पोलो गेम खेळताना आला हृदयविकाराचा झटका

दिलासा : बुलडाण्यात सात दिवसात एकही कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 10:31 IST

आठवड्यापासून बुलडाणा जिल्ह्यात एकही पॉझीटीव्ह रुग्ण आढळून न आल्यामुळे बुलडाणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा : गेल्या एक आठवड्यापासून बुलडाणा जिल्ह्यात एकही पॉझीटीव्ह रुग्ण आढळून न आल्यामुळे बुलडाणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, येत्या दोन दिवसात आणखी एक रुग्ण कोरोना मुक्त होण्याची शक्यता असून प्रसंगी पाच मे रोजी त्याला सुटी दिली जाण्याची शक्यता वैद्यकीय सुत्रांनी व्यक्त केली आहे.बुलडाणा शहरात कामठी येथील ११ पैकी तीन प्रचारक हे २७ एप्रिल रोजी पॉझीटीव्ह आढळून आले होते. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली होती. १३ एप्रिल पासून जिल्ह्यात एकही रुग्ण पाझीटीव्ह नसतांना अचानक तिघे पॉझीटीव्ह आढळून आले होते. त्यामुळे आरोग्य यंत्रणेसह सर्वच यंत्रणा आणखी अलर्टवर आल्या होत्या.

कामठीमधून बुलडाणा जिल्ह्यात धर्मप्रचारक म्हणून आलेल्यांपैकी तिघे पॉझीटीव्ह निघाल्यानंतर त्यांच्या संपर्कातील सर्व व्यक्ती आणि यापूर्वी क्वारंटीन करण्यात आलेलेल्या सर्वच धर्मप्रचारकांची पुन्हा नव्याने कोरोना तपासणी करण्याचे पत्रच जिल्हा पोलिस अधीक्षक कार्यालयाने आरोग्य यंत्रणेला दिले होते. त्यानुषंगाने आतापर्यंत जवळपास ४० पेक्षा अधिक व्यक्तींची तपासणी करण्यात आली असून पोलिस दलातील ३८ जणांची तपासणी करण्यात आली आहे. पैकी २७ पोलिस कर्मचाऱ्यांचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत. तर अन्य संदिग्धांचीही सातत्याने तपासणी करण्यात येत असून गेल्या सात दिवसात तब्बल १६३ जणांचे अहवाल निगेटीव्ह आलेले आहेत.

ही जिल्ह्याच्या दृष्टीने दिलासा देणारी बाब आहे. दरम्यान, तीन मे रोजी सहा जणांचे अहवाल निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे आतापर्यंत जिल्ह्यात ५०२ व्यक्तींचे अहवाल हे नगेटीव्ह आले आहेत. दुसरीकडे चार मे पासून बुलडाणा जिल्हा आॅरेंज झोनमध्ये जाणार आहे. त्यामुळे काही नियमांमध्ये शिथीलता मिळण्याची शक्यता आहे. सध्या जिल्ह्यात एकूण चार रुग्णांवर उपचार करण्यात येत असून यातील तीन बुलडाण्याचे तर एक चिखली येथील असल्याचे सुत्रांनी सांगितले.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या