शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेस देणार कार्यकर्त्यांना ऊर्जा!

By admin | Updated: July 12, 2014 00:14 IST

राज्यभरात निवासी शिबिर : बुलडाण्यापासून सुरूवात

बुलडाणा : लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस जिल्हाभरात आता प्रशिक्षित कार्यकर्त्यांंची फळी तयार करू लागली आहे. प्रत्येक जिल्ह्यात निवडक कार्यकर्त्यांंशी संवाद साधून, लोकसभेतील पराभवावर मंथन करतानाच, विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाचे विचार पोहोचविण्याचे काम अशा प्रशिक्षित कार्यकर्त्यांंच्या माध्यमातून राज्यभरात केले जाणार आहे. या निवासी शिबिरांची सुरूवात बुलडाण्यातून होत आहे.लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे कॉंग्रेस पक्ष पुरता खचून गेला. यामुळे काँग्रेसने आता विरोधी पक्षाची भूमिका बजावणे सुरू केले आहे. विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या असताना, या पराभवातून सावरण्यासाठी कार्यकर्त्यांंना ऊर्जा देण्याचा प्रयत्न निवासी शिबिरांच्या माध्यमातून केला जाणार आहे. काँग्रेस सरकारने राबविलेल्या विविध योजनांची माहिती या तीन दिवसांच्या शिबिरात देतानाच, जनतेशी संवाद, सोशल मीडिया, मार्केटींग अशा संदर्भाने मार्गदर्शनही केले जाणार आहे. शिबिरासाठी कार्यकर्त्यांंची निवड करण्याची प्रक्रिया गत महिनाभरापासून सुरू होती. पक्षस्तरावर हे शिबिर गांभिर्याने घेतले जात आहे. हे पक्षांतर्गत शिबिर असून, यामध्ये कार्यकर्त्यांंच्या भावना जाणून घेत त्यांना प्रशिक्षित केले जाईल, तसेच येणार्‍या निवडणुकीसाठी त्यांच्यात नवचैतन्य निर्माण केले जाणार आहे, असे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांनी सांगितले.