शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

समृद्धी महामार्गाविरोधात काँग्रेस छेडणार आंदोलन

By admin | Updated: September 6, 2016 02:12 IST

शेतक-यांच्या विरोधाची दखल; मेहकर येथील बैठकीतून दिशा ठरविणार.

चिखली(जि. बुलडाणा), दि. ५ : मलेशियानंतर आशिया खंडातील दुसर्‍या क्रमांकाच्या नागपूर - मुंबई 'सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे' मुळे मार्गावरील शेतकर्‍यांच्या जमिनी जाणार असून, काही गावेही यात विस्थापित होणार आहेत. त्यामुळे हा मार्ग शेतकर्‍यांसाठी विनाशाचा मार्ग ठरणार असल्याने या सर्व शेतकर्‍यांचा आक्रोश समजून घेऊन त्यासंदर्भात पुढील आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी ७ सप्टेंबर रोजी मेहकर येथे महामार्ग शेतकरी संघर्ष समितीने बैठक आयोजित केली असून, या शेतकरी लढय़ाचे नेतृत्व करण्यासाठी आमदार भाई वीरेंद्र जगताप, बुलडाणा जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा आ.राहुल बोंद्रे, बुलडाणा आमदार हर्षवर्धन सपकाळ, रिसोड आमदार अमित झनक, यांची या बैठकीस विशेष उपस्थिती राहणार आहे. मेहकर येथील डोणगाव रोडस्थित गजानन महाराज मंदिर सभागृहात ७ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. नागपूर ते मुंबई या द्रूतगती महामार्गामुळे अमरावती, वाशिम, बुलडाणा या जिल्हय़ातील विशेषत: वाशिम, बुलडाणा या जिल्हय़ातील शेती मोठय़ा प्रमाणात अधिग्रहीत केल्या जाणार आहे. त्यात अनेक गावे विस्थापित होणार आहेत. विस्थापित होणार्‍यांची मनोभूमिका जाणून घेऊन व या शेतकर्‍यांची संपूर्ण ताकद पणाला लावून हा शेतकरी जीवनातून उठविण्याचा डाव सर्व मिळवून उधळून लावण्यासाठी विचार विनिमय करण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती काँग्रेसच्यावतीने देण्यात आली असून, याबाबत व्या पक चर्चा होऊन आंदोलनाची दिशा ठरविण्यात येणार असून, या बैठकीस शेतकर्‍यांनी मोठय़ा सं ख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महामार्ग शेतकरी संघर्ष समिती, बुलडाणाद्वारे करण्यात आले आहे.