शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसचे केंद्र सरकार विरोधात निषेध आंदोलन !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:22 IST

बुलडाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या सूचनेवरून जिल्ह्यातील १३ तालुक्यात शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने निषेध ...

बुलडाणा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष, माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या सूचनेवरून जिल्ह्यातील १३ तालुक्यात शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले. या अंतर्गत चिखली येथील जयस्तंभ चौकात मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करून निषेधाचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. स्थानिक जयस्तंभ चौकात राहुल बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या आंदोलनात सर्वोच्च न्यायालयाने एका रिट पिटिशनमध्ये दिलेल्या निकालामुळे पंचायतराज संस्थांमधील ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. याचा मोठा परिणाम होत असून संपूर्ण राज्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपंचायत, नगरपालिका व महानगरपालिकांमधील ओबीसी करिता राखीव असलेल्या जवळपास ५६ हजार जागांवर याचा परिणाम होत आहे. यामुळे संपूर्ण राज्यातील ओबीसींमध्ये असंतोष पसरला आहे. मंडळ आयोग व ७३ आणि ७४ घटनादुरुस्तीनुसार ओबीसींना विविध पातळीवर आरक्षण दिले आहे़ त्यामुळे त्यांचे आरक्षण कायदेशीर असून त्याचे संरक्षण होणे गरजेचे आहे. ओबीसी प्रवर्गातील वंचितांना लोकशाही प्रक्रियेत राज्य संस्थांमध्ये पर्याप्त प्रतिनिधित्व मिळणे गरजेचे असल्याची मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात तालुकाध्यक्ष समाधान सुपेकर, शहराध्यक्ष अतहरोद्दीन काझी, दीपक देशमाने, नंदकिशोर सवडतकर, अ. रफीक अ. कादर, डॉ. सत्येंद्र भुसारी, डॉ.मो.इसरार, डॉ. अमोल लहाने, प्रदीप पचेरवाल, अ‍ॅड. प्रशांत देशमुख, नासीर सौदागर, अ‍ॅड. विलास नन्हई, बंडू कदम, आदींसह काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने सहभागी झाले होते. प्रास्ताविक गजानन खंडारे, सूत्रसंचालन डॉ.सत्येंद्र भुसारी तर आभार प्रदर्शन डॉ. अमोल लहाने यांनी मानले.