देऊळगावराजा नगर परिषदमध्ये भाजपाचे चार सदस्य, शिवसेना पाच, राष्ट्रवादी चार, काँग्रेस चार व अपक्ष एक, असे पक्षीय बलाबल आहे. नगराध्यक्षा सुनीता रामदास शिंदे या भाजपाच्या आहेत. २०२१ करिता विविध विषय समिती सभापतींची निवड करण्यासाठी गुरुवारला विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पीठासीन अधिकारी म्हणून तहसीलदार सारिका भगत यांनी काम पाहिले. निर्धारित वेळेत चार विषय समितींच्या सभापती निवडीसाठी चारच अर्ज प्राप्त झाल्याने पीठासीन अधिकाऱ्यांनी शिक्षण समिती सभापतीपदी- विष्णू शिवदास रामाणे, राष्ट्रवादी काँग्रेस, आरोग्य समिती सभापतीपदी- रंजना बाळू शिंगणे, राष्ट्रवादी काँग्रेस, बांधकाम समिती सभापतीपदी- शमीमबी शे. इस्माईल, काँग्रेस, महिला व बालकल्याण समिती सभापतीपदी- विद्या अतिष कासारे, काँग्रेस पक्ष, यांची अविरोध निवड जाहीर केली. सर्व नवनियुक्त सभापतींचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी आघाडीचे सर्व नगरसेवक उपस्थित होते.
देऊळगावराजा नगर परिषदेच्या विषय समित्यांवर काँग्रेस-राष्ट्रवादीचे वर्चस्व
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:31 IST