शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसला घ्यावी लागणार मेहनत

By admin | Updated: September 1, 2014 22:48 IST

मागील वीस वर्षांपासून प्रत्येक विधानसभा निवडणुकीत भाजपाचे आमदार चैनसुख संचेती यांना लीड देणारे नांदुरा शहर भाजपाचा गड बनले आहे.

नांदुरा: मागील वीस वर्षांपासून प्रत्येक विधानसभा निवडणुकीत भाजपाचे आमदार चैनसुख संचेती यांना लीड देणारे नांदुरा शहर भाजपाचा गड बनले आहे. शहरात काँग्रेस आहे; मात्र नगरपालिकेत सत्ता नसल्याने त्यांची शक्ती गटागटात विभागली आहे. त्यामुळे शहरात भाजपाची घोडदौड थांबविण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीला या विधानसभा निवडणुकीत जास्त जनसंपर्क व पक्षीय रचनात्मक फेरबदल करणे गरजेचे आहे.शहरात भाराकाँचा एकवीसपैकी एकच नगरसेवक आहे. त्यावरून पक्षाच्या ताकदीचा अंदाज येतो; मात्र शहरात काँग्रेस विचारसरणीचे कार्यकर्ते व नागरिक आहेत.भाजपात माजी नगराध्यक्ष राजेश एकडे आल्याने भाजपा मजबूत झाली; मात्र पूर्वीच्या नगरसेवक व पदाधिकारी यांच्या भूमिकेमुळे भाजपातही गटाचे राजकारण शिरले आहे. मात्र नगराध्यक्ष भाजपाचा आहे.शिवसेनेचे शहर प्रमुख लालाभाऊ इंगळे यांचा शहरात व्यापक जनसंपर्क असल्याने त्याचा फायदा भाजपाला होईल; मात्र त्यांच्या पक्षाचे दोन नगरसेवक काय भूमिका घेतात, याकडे शहरवासीयांचे लक्ष वेधले आहे.शहरावर मजबूत पकड असलेल्या आ. चैनसुख संचेती यांना भाजपा एकसंघ ठेवण्याचे, तर काँग्रेस-राष्ट्रवादीला जुन्या व नवीन कार्यकर्त्यांचा मेळ करून नवीन ताकद उभारण्याचे आवाहन आहे.विश्‍वप्रसिद्ध हनुमान मूर्तीमुळे अध्यात्मिक ओळख असलेले नांदुरा शहर खव्याच्या व्यापारामुळे व व्यावसायिक प्रतिष्ठानांमुळे नावारूपास आले आहे. मागील २0 वर्षात न.प. वर नगरविकास आघाडी स्थापन करून राजेश एकडे व नंतर भाजप यांचीच सत्ता आहे. खंदे कार्यकर्ते असतानाही काँग्रेसला सत्ता प्राप्त झाली नाही. मागील न.प. निवडणुकीत शहर अध्यक्ष रतन भोंगे यांनी मेहनत घेतली; मात्र नवीन राजकीय समीकरणांमुळे त्यांना यशोशिखर गाठता आले नाही. मागील २0 वर्षात आ. संचेती यांनी नांदुरा शहरावर मजबूत पकड ठेवली. मागील चारपैकी एका निवडणुकीत त्यांना लीड मिळाला नव्हता त्यावेळी प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा ४00 मतांनीचे ते मागे होते. त्यावेळी न.प.त सत्ता राजेश एकडे यांच्या नगरविकास आघाडीची होती; मात्र इतर तीन वेळा आ. संचेती यांना निर्णायक लीड या शहराने दिला आहे. आज रोजी राजेश एकडे यांच्या खांद्यावर शहर भाजपाची धुरा आहे; मात्र न.प. नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपातील मनोभेद समोर आल्याने भाजपाला एकसंघ ठेवण्याचे आवाहन आ. संचेती यांना आहे. शहरात नवीन पाणीपुरवठा योजना, ग्रामीण रुग्णालय, अग्निसुरक्षा यंत्रणा, नांदुरा ग्रामीण पाणीपुरवठा योजना, रेल्वे उड्डाणपुलासाठी निधीची तरतूद आदींसह शहरातील अंतर्गत रस्ते यांच्याकरिता त्यांच्या व खासदार अजय संचेती यांच्या निधीतून विकासकामे तडीस नेल्याने त्यांची जमेची बाजू आहे. एकसंघ भाजप व सोबत शिवसेना यांची अभेद्य युती काँग्रेस राष्ट्रवादीच्या आघाडीसाठी तगडे आवाहन आहे.भाजपा-सेना युतीप्रमाणे शहरात काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे मोठे नेटवर्क आहे. मोदी लाटेत शहरात भाजपाला लीड मिळाला; मात्र त्या तुलनेत काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला मिळालेली मते आजही शहरात ते तगडे आव्हान देऊ शकतात याचा प्रत्यंतर करून देतात. काँग्रेस शहर अध्यक्ष रतन भोंगे त्यांच्या नवीन जोमाच्या कार्यकर्त्यांच्या फळीसोबत जुनेजाणते अनुभवी पदाधिकारी व राष्ट्रवादी एकसंघ होऊन कामाला लागल्यास भाजपाचा गड संबोधल्या जाणार्‍या नांदुरा शहरातही चमत्कार होऊ शकतो; मात्र त्याकरिता काँग्रेसला सर्वशक्तीनिशी एकसंघ होऊन प्रत्येक मतदारांपर्यंत पोहचावे लागेल व हाडाच्या कार्यकर्त्यांना सोबत घ्यावे लागेल.यावेळी काँग्रेसकडून नांदुरा तालुक्यात उमेदवारी देण्याची मागणी होत आहे. जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती बलदेवराव चोपडे हे उमेदवारी साठी स्पध्रेत असून, शिवचंद्र तायडे व डॉ. अरविंद कोलते हेसुद्धा शर्यतीत आहेत. तायडे व कोलते यांनी यापूर्वी संचेती यांच्याशी लढत देऊन पराभव पत्करला असल्याने आता नवा प्रयोग म्हणून नांदुर्‍याला प्रतिनिधित्व देण्याची मागणी रेटून धरली आहे.आज रोजी आ. संचेती यांचा मागील २0 वर्षांचा व्यापक जनसंपर्क, ताब्यात असलेली नगरपालिका व राजेश एकडेसारखा अनुभवी शहर अध्यक्ष आणि सोबत युतीत शिवसेना शहर प्रमुख लालाभाऊ इंगळे या आमदार संचेती यांच्या जमेच्या बाजू आहेत. मात्र नांदुरा शहरात सत्ता नसली तरी काँग्रेस-राष्ट्रवादीचा मोठा कार्यकर्ता वर्ग व पदाधिकार्‍यांचे जाळे आहे. त्यांच्यामध्ये उमेदवाराने आत्मविश्‍वास निर्माण केला व सोबत भाजपा-शिवसेना विरुद्ध सर्व आघाड्यांवर लढा दिला, तर भाजपाच्या या मजबूत गडाला तडे देण्यची क्षमता व ताकद भाराकाँ -राष्ट्रवादी आघाडीत आहे. शहरात भारिप-बमसं व इतर काही पक्ष हे र्मयादित ताकदीत आहेत; मात्र सक्षम उमेदवार त्या पक्षांचा असल्यास ते मुख्य पक्षांची निर्णायक मते वळवू शकतात.