शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसच्या हाती निलंबनाचे हत्यार

By admin | Updated: November 17, 2014 00:49 IST

सदस्य नोंदणीच्या निमित्ताने काँग्रेस पुन्हा एकदा कामाला लागण्याची चिन्हे.

राजेश शेगोकार / बुलडाणाविधानसभा निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर काँग्रेसने बुलडाण्यातील आपली संख्या कायम ठेवली असली तरी सत्ता गेल्यामुळे कार्यकर्त्यांसह पक्षामध्येही मरगळ आली आहे. ही मरगळ झटकून टाकण्यासाठी सदस्य नोंदणीच्या निमित्ताने काँग्रेस पुन्हा एकदा कामाला लागण्याची चिन्हे असतानाच पहिल्याच अधिवेशनात निलंबित झालेल्या पाच आमदारांमध्ये चिखलीचे आमदार राहुल बोंद्रे यांचा बळी गेला. विश्‍वासमत प्रस्तावाविरोधातील काँग्रेसचा आवाज दाबण्यासाठी हे निलंबन केल्याचा आरोप काँग्रेसकडून होत असला तरी आता याच निलंबनाचा हत्यार म्हणून वापर करीत काँग्रेस पुन्हा एकदा लोकांमध्ये जाण्यासाठी सज्ज झाला आहे. कुठल्याही पक्षाला किंवा नेत्याला पराभवानंतर लोकांमध्ये जायचे असेल, तर प्रभावी मुद्दा लागतो तो मुद्दा या निलंबनाच्या निमित्ताने काँग्रेसच्या हाती लागल्याने येणार्‍या काळात बुलडाण्यातील काँग्रेसही राहुल मय होईल, हे स्पष्टच होत आहे.निलंबनाबाबत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षाची आगामी भूमिका मांडली यावेळी निलंबित आमदार राहुल बोंद्रे व प्रत्यक्षदश्री आमदार हर्षवर्धन सपकाळ यांनी संपूर्ण घटनाक्रम मांडला. आपली बाजू मांडत असताना सरकारच्या भूमिकेचा परिषद व विधानसभा या दोन्ही सभागृहातील विरोधाभासी भूमिकेवर त्यांनी बोट ठेवले व या प्रकरणातील एकूणच भूमिका मांडताना सरकारने जाणीवपूर्वक हा कट रचल्याचा आरोप त्यांनी केला त्यामुळे या प्रकरणातील राजकारण आता राज्यस्तरावर रंगणार असून, त्याचे पडसाद जिल्हास्तवरही पडतील. येणार्‍या हिवाळी अधिवेशनापर्यंत हा मुद्दा ताणून धरला जाईल. या निमित्ताने भाजपाने राष्ट्रवादीचा घेतलेला अप्रत्यक्ष पाठिंबा, सेनेची सत्तेत सहभाग घेण्यासाठी होत असलेली ससेहोलपट या मुद्यांवर काँग्रेसला या दोन्ही पक्षांना सहज टार्गेट करता येणे शक्य आहे, या मुद्यावर भाजपा बचावात्मक पवित्र्यात आहे त्यामुळे भाजपाला टार्गेट करण्यासाठी काँग्रेसला आधी एकसंघ होण्याची गरज आहे.    या पृष्ठभूमीवर राहुल बोंद्रे यांचे निलंबन हेच हत्यार म्हणून काँग्रेसने हातात घेतले असल्याने मरगळलेल्या पक्षामध्ये काही प्रमाणात चेतना येईल व विरोधकांवरही राजकीय वार करता येईल. त्यामुळे आगामी काळात काँग्रेस याचा प्रभावी वापर कसा करते, यावरही काँग्रेसची दिशा अवलंबून आहे.*स्वाभिमानी पुन्हा सोयाबीन आंदोलनातभाजपाच्या सत्तास्थापनेसाठी देवेंद्र फडणवीस यांनी चार गडी राखत मनातल्या मनात शरद पवारांचे नाव घेऊन विश्‍वासमत प्रस्ताव जिंकला. या चार गड्यांमध्ये मेटे, आठवले, जानकरांसोबतच शेट्टी यांचाही समावेश आहे. याच स्वाभिमानीचे राजू शेट्टी यांचे खंदे सर्मथक पहिल्या फळीचे युवा नेते रविकांत तुपकर यांनी पुन्हा एकदा मूळ भूमिकेत येत सोयाबीन व कापूस प्रश्नावर हात घालून आंदोलनाची हाक दिली. *मनसे नव्या विठोबाच्या शोधातमनसेच्या स्थापनेनंतर महाराष्ट्रात पहिला जिल्हा परिषद सदस्य बुलडाण्याने विनोद वाघ यांच्या रूपाने दिला. वाघ यांनी विविध आंदोलनाच्या माध्यमातून मनसेला चर्चेत ठेवले; मात्र त्यांच्या आंदोलनात मुख्य टार्गेट हे राष्ट्रवादीचे डॉ. राजेंद्र शिंगणे हे कायमच राहिले. वाघ यांच्या विरोधाने शिंगणे यांच्या मार्गात काहीही अडकाठी आली नाही. यावेळी मात्र निवडणुकीच्या मार्गावर शिंगणे नव्हतेच तरीही वाघ यांना पराभव पाहावा लागला.