शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
3
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
4
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
5
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
6
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
7
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
8
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
9
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
10
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
11
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
12
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
13
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
14
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
15
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
16
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
17
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
18
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
19
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
20
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
Daily Top 2Weekly Top 5

महागाईविरोधात काँग्रेसचा सायकल मोर्चा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:40 IST

चिखली : पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईविरोधात १२ जुलै रोजी चिखली तालुका व शहर काँग्रेसच्या ...

चिखली : पेट्रोल, डिझेल, एलपीजी गॅस, खाद्यतेलासह इतर जीवनावश्यक वस्तूंच्या महागाईविरोधात १२ जुलै रोजी चिखली तालुका व शहर काँग्रेसच्या वतीने शहरात सायकल मोर्चा काढून केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. भाजप सरकारने महागाई भरमसाट वाढविली असून कोरोनाकाळात अगोदरच अडचणीत असलेल्या सर्वसामान्य जनतेच्या पैशावर दरोडा घालत असल्याचा आरोप या वेळी जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे यांनी केला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाभरात आंदोलन सप्ताह राबविण्यात येत आहे. याअंतर्गत १२ जुलै रोजी काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष बोंद्रे यांच्या नेतृत्वात शहरातून सायकल मोर्चा काढून वाढत्या महागाईविरोधात केंद्र सरकारचा निषेध व्यक्त करण्यात आला. या सायकल मोर्चामध्ये काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते. दरम्यान, तालुकाध्यक्ष समाधान सुपेकर, बाळू साळोख, संजय गिरी, रूपराव म्हस्के यांच्या हस्ते तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे, जिल्हा उपाध्यक्ष विष्णू पाटील कुळसुंदर, अशोकराव पडघान, डॉ. सत्येंद्र भुसारी, प्रदीप अंभोरे, ज्ञानेश्वर सुरूशे, डॉ. अमोल लहाने, सचिन बोंद्रे, अ‍ॅड. प्रशांत देशमुख, डॉ. म. इसरार, मो. आसीफ मो. शरीफ, रफिक कुरेशी, अमीनखाँ उस्मानखाँ, रामदास मोरे, हाजी रऊफबाबू, किशोर कदम, विजय गाडेकर, गोकुळ शिंगणे, समाधान गीते, शहेजाद अली, पप्पू जागृत, दत्ता करवंदे, बळीराम हाडे, जितेंद्र राजपूत आदींसह बहुसंख्य पदाधिकारी सहभागी झाले होते.

केंद्र सरकारविराेधात दिल्या घाेषणा

मोर्चादरम्यान केंद्र सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली. काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयापासून सुरू झालेला हा सायकल मोर्चा शहरातील प्रमुख मार्गांहून होत बसस्थानक परिसरातून परत काँग्रेसच्या जनसंपर्क कार्यालयात त्याचा समारोप झाला.