शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा गोंधळ

By admin | Updated: September 2, 2014 23:23 IST

आचार संहितेमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची शक्यता मावळली असून २९ जिल्हा परिषदांना मुदतवाढीची प्रतीक्षा कायम आहे.

बुलडाणा : राज्यातील २९ जिल्हा परिषद अध्यक्षांचा कार्यकाळ २0 सप्टेंबर तर पंचायत समिती सभापतींचा कार्यकाळ १३ सप्टेंबर रोजी संपत आहे. या काळात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता राहणार असल्याने, जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडणुकीला मुदतवाढ मिळण्याची शक्यता वर्तविली जात होती; मात्र शासनाने या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्याने ती शक्यता आता मावळली आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने, त्याविषयीच्या लेखी सूचना स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्यांना देण्यात आल्या; मात्र या लेखी सूचना परत घेण्याचा प्रकार सोमवारी घडल्याने याबाबत गोंधळ निर्माण झाला आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियमन १९६१ च्या कलम ५९(१) आणि कलम ११(१) मधील तरतुदीनुसार, सार्वत्रिक निवडणुकीत निवडून आलेल्या सदस्यांतून जिल्हा परिषदेत पदाधिकारी म्हणून निवडलेल्या सदस्यांचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन पदाधिकार्‍यांची निवड करण्याचे शासनाचे आदेश आहेत. त्यानुसार १४ आणि २१ सप्टेंबर रोजी या पदाधिकार्‍यांची निवड केली जाणार आहे. शासनाच्या ग्रामविकास विभागाने हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्यानंतर, सोमवारी मोताळा पंचायत समितीच्या सदस्यांना त्याविषयीच्या लेखी सूचना देण्यात आल्या; मात्र सदस्यांना वितरीत करण्यात आलेली सूचनापत्र काही वेळातच त्यांच्याकडून परत घेण्यात आले. अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयाकडून जिल्हा प्रशासनाला आलेल्या तोंडी आदेशानुसार ही सूचनापत्र परत घेण्यात आली. त्यामुळे पदाधिकार्‍यांच्या निवडणुकीस मुदतवाढ मिळण्याच्या हालचाली शासन स्तरावर सुरू असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.विधानपरिषद निवडणूक आचारसंहिता लागू झाल्याने शासनाने जून महिन्यात होणार्‍या राज्यातील १९५ नगरपालिका अध्यक्षांच्या निवडणुकीस १0 जून रोजी ६ महिन्यांची मुदतवाढ दिली होती. ती मुदतवाढ न्यायालयाच्या दणक्यामुळे मागे घेण्यात आली होती. या प्रकारामुळे आता जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षांच्या निवडणुकीस मुदतवाढ देण्याबाबत शासन अतिशय सावध आहे. मंत्रिमंडळाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला, तर राज्यातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया या सहा जिल्हा परिषदा वगळून उर्वरीत सर्व जिल्हा परिषदांना हा निर्णय लागू राहील. २00५ आणि २00९ च्या विधानसभा निवडणुकीच्या काळातही अध्यक्ष, उपाध्यक्षांना मुदतवाढ देण्यात आली होती, हे विशेष.