शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
2
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
3
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
4
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
5
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
6
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
7
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
8
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
9
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
10
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
11
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
12
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
13
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
14
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
15
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
16
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
17
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
18
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
19
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
20
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना बाधीताच्या रिपोर्टमध्ये घोळ? :  जिल्हा प्रशासनाने दिले चौकशीचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 19:17 IST

या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांना दिले आहेत.

बुलडाणा: कामठी येथील कोरोना पॉझीटीव्ह निघालेल्या तीन धर्मप्रचारकांपैकी एका धर्मप्रचारकाच्या एकाच स्वॅब नमुन्याचे १६ तासांच्या फरकाने निगेटीव्ह व नंतर पॉझीटीव्ह अहवाल आल्याने निर्माण झालेला विरोधाभास पाहता या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडीत यांना दिले आहेत.बुलडाणा शहरातील प्रतिबंधीत क्षेत्रातील एका धार्मिक स्थळी राहणाºया कामठी येथील ११ धर्मप्रचारकांचे स्वॅब नमुने २५ एप्रिल रोजी घेण्यात आले होते. यातील तिघांच्या नमुन्यांचा अहवाल पॉझीटीव्ह आला होता. मात्र यातील एका ७५ वर्षीय व्यक्तीचा अकोला लॅबमधून ७५५ क्रमांकाचा जावक क्रमांक असलेल्या स्वॅब नमुन्याचे दोन अहवाल १६ तासांच्या फरकाने जिल्हा शल्यचिकित्सक कार्यालयास अनुक्रमे २६ आणि २७ एप्रिल रोजी प्राप्त झाले होते. एकाच व्यक्तीच्या एकाच स्वॅब नमुन्याचे एकाच जावक क्रमांकावर एकदा निगेटीव्ह व एकदा पॉझीटीव्ह अहवाल प्राप्त झाल्यामुळे एकंदर या अहवालाबाबत संभ्रम निर्माण झाला होता. या प्रश्नी आझाद हिंद संघटनेचे अ‍ॅड. सतिश् रोठे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एक निवेदन देवून प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली होती. मात्र या प्रश्नी जिल्हा प्रशासनाकडून कोणतीही माहिती उपलब्ध होत नव्हती. अखेर या प्रकरणी जवळपास आठ दिवसानंतर जिल्हा प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची जिल्हा शल्यचिकित्सक यांना चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सोबतच संपूर्ण प्रकरणाची चौकशी झाल्यानंतर तसा कार्यपुर्ती अहवालही जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्याबाबत निर्देशीत करण्यात आले आहेत.

तक्रार समितीने घेतली दखलआझाद हिंद संघटनेने निवेदनाद्वारे केलेल्या या तक्रारीची दखल कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंध तक्रार समितीने आठ दिवसानंतर घेतली. सोबतच प्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक यांना अनुषंगीक चौकशीचे आदेश देत संबंधीत तक्रारकर्त्यांनाही परस्पर केलेल्या कार्यवाहीची माहिती कळविण्याबाबत सुचीत केले असल्याची माहिती या समितीच्या नोडल अधिकारी गौरी सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याbuldhanaबुलडाणा