शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

भाजपातील कलह काँग्रेसला पोषक

By admin | Updated: August 19, 2014 23:15 IST

कार्यकर्त्यांमध्ये धुमसत असलेला असंतोष दूर करण्यात आमदार बोंद्रे बर्‍याच अंशी यशस्वी ठरले आहेत.

चिखली: चिखली मतदार संघात काँग्रेसचे आमदार राहुल बोंद्रे यांच्या विरोधात कार्यकर्त्यांमध्ये धुमसत असलेला असंतोष दूर करण्यात आमदार बोंद्रे बर्‍याच अंशी यशस्वी ठरले आहेत. पक्षीय पातळीवर या बहाद्दराने विरोधकच शिल्लक ठेवलेला नाही. जे आहेत ते केवळ बोलघेवडेपणा करून तोंडाची वाफ गमावण्यात धन्यता मानत असल्याने आ.बोंद्रे यांचेही बरेच फावते. अशीच अवस्था त्यांनी भाजपवाल्यांची करून ठेवली आहे. भाजपावाले मूग गिळून गप्प आहेत. वास्तविक जनतेच्या अनेक समस्यांवर भाजपवाल्यांना रान पेटवता आले असते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा लोहपुरूष त्यांच्या पाठीशी असताना भाजपावाले अनेक समस्यांवर आंदोलने छेडू शकले असते. परंतू दुर्देवाने तसे घडले नाही अन् भविष्यातही तसे घडण्याची सुतराम शक्यता नाही. असे असताना एक गोष्ट मात्र अत्यंत शिस्तबध्दरित्या घडतांना दिसून येत आहे. ते म्हणजे भाजपा अंतर्गत चाललेली बंडाळी. ह्यमोदी फीव्हरह्णचा जोर असतानाही अंतर्गत भांडाणांमुळे या मतदारसंघात भाजपाचे भविष्य अवघड असल्याचे चित्र आहे. नवे विरूध्द जुने हा वाद भाजपात पेटला आहे. मोदीजींनी एकाच फटक्यात केंद्रात भरभरून मिळविलेले यश चिखलीच्या भाजपावाल्यांच्या डोक्यात शिरलं आहे. काँग्रेस-राष्ट्रवादी आणि तत्सम पक्षांची केलेली धुळधाण पाहून भाजपाकडे येणार्‍यांचा ओढा असणे सहाजीकच आहे. परंतू हीच बाब जुन्या जाणत्यांना खुपते आहे. नवख्यांची सुरू असलेली हेळसांड त्यांना देण्यात येणारी अपमानजनक वागणूक काँग्रेसच्या पथ्यावर पडत आहे. याचाही सोयीस्कर विसर भाजपावाल्यांना पडला आहे. उमेदवारी मिळण्याचे मेरीट पक्षाने आखून दिले आहेत. त्यानुसार काम करण्याचा प्रयत्न भाजपावाल्यांनी करणे गरजेचे आहे. दूसरीकडे या पक्षातुन इच्छूक असलेले संजय चेके पाटील यांनीच कार्यक्रमाचा धडाका लावला असुन सध्या बाकीचे स्पर्धक बॅकफुट वरच आहेत.काँग्रेसेचे विद्यमान आमदार आ. राहूल बोंद्रे यांचे काम जोमात सुरू आहे. गरूडझेप प्रकल्प, नदी खोलीकरण, पांदणरस्ते, भूमीपुत्र ग्रामदरबार यासारखे असंख्य राज्याला पथदश्री ठरणारे प्रकल्प लोकसहभागातून राहुल बोंद्रे राबवित आहेत. त्यामुळे त्यांचा आलेख चढता आहे. प्रतिकूल राजकीय स्थिती असताना देखील ते आपल्या कामात मग्न आहेत. तर दुसरीकडे अनुकूल स्थिती असूनही केवळ हेवेदाव्यांमुळे भाजपाच्या गोटात स्पर्धा सुरू झाली आहे. भाजपाचे वरिष्ठ नेतेही याकडे लक्ष घालण्यास तयार नाहीत. त्यांनी थोडे लक्ष घातले तर काँग्रेसचे पानीपत व्हायला वेळ लागणार नाही. आ.बोंदे यांनाही निवडणूक सोपी नाही त्यांनाही अनेक समस्यांनी घेरलेले आहे. भाऊबंदकीचा फटका त्यांनाही बसणार आहे. गतवेळी त्यांचे काका भारतभाऊ बोंद्रे विरोधात होते. तर यावेळी त्यांचे चुलत भाऊ माजी नगराध्यक्ष विनायक बोंद्रे हे बसपाकडून लढण्याची भाषा करीत आहेत. पालीकेचे विद्यमान स्विकृत सदस्य कुणाल बोंद्रे यांनीही काँगेसकडून उमेदवारी मागतली आहे. त्यामुळे अडचणी वाढतील. या दुहीच्या परिस्थितीचा फायदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला होवू शकतो. स्वाभिमानीचे नेते चिखलीची जागा सोडून घेण्यासाठी जिद्दीला पेटले आहेत. भाजपाची अंतर्गत दुही ही स्वाभिमानीला पोषक ठरू शकते. स्वाभिमानीेचे युवा आघाडी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर हा बहुजन चेहरा आहे. शेतकरी आंदोलनातून तावून सलाखून निघाल्याने सर्वसामान्यांच्या समस्यांची जाण आहे. हे ध्यानी घेवून भाजपवाल्यांनी आपसी नवे-जुने असा वाद मिटवून एकत्रीतपणे सामोरे जावे अन्यथा, 'नशीबाने मिळालेलं कर्माने नेलं' अशी गत झाल्याशिवाय राहणार नाही.