शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

खामगावात विरोध मावळला; पालिकेत ‘सकारात्मक’तेची नांदी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 01:14 IST

खामगाव: घाटाखालील सर्वात मोठी नगरपालिका म्हणून नावलौकिक असलेल्या खामगाव नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील परस्पर विरोधी राजकीय घडामोडींचा डंका संपूर्ण जिल्ह्यात आहे; मात्र कुरघोडीच्या राजकारणाला तिलांजली देत, विकास कामांच्या मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधार्‍यांमधील कटूता मावळत असल्याचे चित्र आहे. परिणामी, खामगाव पालिकेतील राजकारण सकारात्मकतेच्या दिशेने जात असल्याची चर्चा आहे.

ठळक मुद्देपहिल्यांदाच आठ विषयांना सर्वानुमते मंजुरी१९ डिसेंबरची सभा ठरली ‘खास’!

अनिल गवई । लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: घाटाखालील सर्वात मोठी नगरपालिका म्हणून नावलौकिक असलेल्या खामगाव नगरपालिकेतील सत्ताधारी आणि विरोधक यांच्यातील परस्पर विरोधी राजकीय घडामोडींचा डंका संपूर्ण जिल्ह्यात आहे; मात्र कुरघोडीच्या राजकारणाला तिलांजली देत, विकास कामांच्या मुद्यावरून विरोधक आणि सत्ताधार्‍यांमधील कटूता मावळत असल्याचे चित्र आहे. परिणामी, खामगाव पालिकेतील राजकारण सकारात्मकतेच्या दिशेने जात असल्याची चर्चा आहे.खामगाव मतदार संघातील बलाढय़ स्थानिक स्वराज्य संस्था म्हणून खामगाव नगरपालिकेकडे पाहिल्या जाते. या नगरपालिकेतील राजकीय घडामोडींचा प्रभाव मतदार संघात पडतो. परिणामी, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलेच शह-काटशहाचे राजकारण इथे रंगते. पालिका सभागृहातील घडामोडीचे थेट पडसाद बाहेर(मतदार संघात) उमटतात. त्यामुळे खामगाव नगरपालिकेतील राजकारणाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून असते. सद्यस्थितीत खामगाव नगरपालिकेवर भाजपचे वर्चस्व आहे. तर काँग्रेस येथे विरोधी पक्षाची भूमिका अदा करीत आहे. दरम्यान, खामगाव पालिकेत ‘परिवर्तना’ची म्हणजेच भाजपची सत्ता आल्यापासून डिसेंबर अखेरीस सुमारे १0 सर्वसाधारण आणि विशेष सभा पार पडल्या. यापैकी बहुतांश सभा या सत्ताधारी आणि विरोधकांच्या विरोधामुळेच गाजल्या. फेब्रुवारी २0१७ ते नोव्हेंबर २0१७ पर्यंत पार पडलेल्या  १ जुलै २0१७ च्या सर्वसाधारण सभेचा (एका विषयापुरता) अपवाद वगळता सर्वच सभा या वादळी ठरल्या. १ जुलै २0१७ रोजी नगर परिषदेमध्ये आयोजित सभेची सुरुवात राष्ट्रगीताने करण्याबाबतचा हा ठराव सर्वानुमते संमत झाला होता; मात्र तत्पूर्वी पालिकेत ‘श्रेया’वरून राजकारण रंगले होते, हे येथे उल्लेखनीय! 

१९ डिसेंबरची सभा ठरली ‘खास’!४७ विषयांना मंजुरी देण्यासाठी नगरपालिकेची सर्वसाधारण सभा १९ डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आली. यासभेत विषयसूचीवरील ६ विषय वगळता उर्वरित ३३ विषयांच्या मंजुरीला विरोधकांच्या विरोधाचा सूर मावळता होता. दरम्यान, तब्बल पहिल्यांदाच एक-दोन नव्हे तर आठ विषय सर्वानुमते (सत्ताधारी-विरोधकांच्या सहमतीने) मंजूर झाले. पालिकेच्या इतिहासात ही सभा महत्त्वपूर्ण ठरली. एकाचवेळी आठ विषयांच्या सहमतीमुळे ही सभा पालिकेतील सकारात्मकतेची नांदी असल्याची चर्चा आहे.

शहरातील रेंगाळलेल्या विविध विकास कामांना गती देण्याची गरज आहे. दरम्यान, शहरातील विकास कामांच्या मुद्यावर राजकारण न करता एकत्र येण्याची गरज आहे. विकास कामासाठी आपला विरोध नाही.- विजय वानखडे, नगरसेवक, भारिप- बमसं, खामगाव

सत्ताधार्‍यांकडून बहुमताच्या जोरावर विरोधकांची मुस्कटदाबी केली जाता कामा नये. विकासासाठी आमचा  तत्त्वत: विरोध असणार नाही; मात्र सत्ताधार्‍यांच्या चुकीच्या धोरणाला राष्ट्रवादीचा विरोध कायम असेल.- देवेंद्र देशमुख, नगरसेवक, तथा शहरअध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस

 शहराचा सर्वांगीण विकास साधत, विविध विकास कामांना सत्ताधार्‍यांचा प्राधान्यक्रम राहतो; मात्र प्रत्येक सभेत विषयांतर करीत गोंधळ घालण्याचे विरोधकांचे प्रयत्न राहतात. विकासाची काळजी विरोधकांनाच नसून आमची भूमिका विकासाचीच आहे.- अनिता डवरे, नगराध्यक्ष, खामगाव. 

टॅग्स :khamgaonखामगाव