मलकापूर(जि. बुलडाणा) : गेल्यावर्षी विविध छाप्यांमध्ये जप्त करण्यात आलेली देशी दारू तथा गुटखा यांचा साठा दसरखेड एमआयडीसी पोलिसांनी २४ जानेवारीला नष्ट केला. उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र साळुंके यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षी दसरखेड पोलिसांनी नऊ गुन्ह्यांमध्ये ३ हजार ५0 रुपयांची देशी दारू जप्त केली होती. सोबतच २२ हजार ५00 रुपयांचा गुटखाही जप्त केला होता. बाजारभावानुसार या जप्त केलेल्या साहित्याची किंमत अधिक आहे. बराच कालावधीपासून पडून असलेला हा साठा अखरे दसरखेड पोलिसांनी नष्ट केला. पोलीस निरीक्षक संजय सोनवणे, सहायक पोलीस निरीक्षक आशिष लव्हंगळे, हेडकॉन्स्टेबल सुभाष पहुरकर, संजय निंबोळकर, दिलीप रोकडे, नीलेश तोमर, गोपाल इंगळे, यांच्यासह दसरखेडचे सरपंच संतोष साठे, विजय साठे, श्रावण पाटील, संतोष मुलांडे, राजू साठे, समाधान साठे, विनोद बोदडे याप्रसंगी उपस्थित होते. मध्यंतरी अन्न व औषध प्रशासनाने २0 लाख रुपयांचा जप्त केलेला गुटखा व अन्य साहित्य जप्त केले होते.
जप्त गुटखा व दारूसाठा पोलिसांनी केला नष्ट
By admin | Updated: January 25, 2016 02:19 IST