शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरातील उर्दू शिक्षकांवर गंडांतर

By admin | Updated: November 17, 2016 17:25 IST

दुसऱ्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या शिक्षकांना स्व जिल्ह्यात बदली करुण घेण्यासाठी आंतरजिल्हा बदली नुसार नियम लावण्यात आले आहेत

ऑनलाइन लोकमतबुलडाणा, दि. 17 : दुसऱ्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद अंतर्गत काम करणाऱ्या शिक्षकांना   स्व जिल्ह्यात बदली करुण घेण्यासाठी आंतरजिल्हा बदली नुसार नियम लावण्यात आले आहेत. मात्र  या नियमांच्या फेऱ्यात राज्यभरातील उर्दू माध्यमांचे शिक्षक  अडकले आहेत. या फेऱ्यातून बाहेर पडण्यासाठी अनेक शिक्षक शिक्षण विभाग कार्यालयात मागील पाच वर्षापासून चकरा मारीत आहेत. या संदर्भात शिक्षण विभाग व जिल्हा परिषदेने जवाबदारी झटकल्याचा आरोप शिक्षण संघटनेकडून केला जात आहे. जिल्हा परिषद अंतर्गत सर्वत्र उर्दू माध्यमांच्या शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. प्राथमिक विभागाच्यावतीने  पात्र डीएड बीएड धारकांना शिक्षक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. काहींची निवड जिल्ह्यात झाली आह, तर काहींची निवड, रत्नागिरी, रायगड, बीड, उस्मानाबाद, अकोला, नांदेड, वाशिम इतर जिल्ह्यात मोठया प्रमाणात झाली आहे. अनेक शिक्षकांची सेवा पाच वर्षापेक्षा अधिक झाली आहे त्यामुळे नियमानुसार  ते  शिक्षक स्वत जिल्ह्यात बदलीची मागणी करीत आहेत.

आता पर्यत जिल्हा परिषदेकडे ७० पेक्षा जास्त प्रस्ताव पाठविण्यात आले आहेत, मात्र या प्रस्तावावर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. तसेच यासंदर्भात प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने खुला प्रवर्गातील बिंदू हे अतिरिक्त असल्याने आंतर जिल्हा बदली मधून येणाऱ्या खुला प्रवर्गातील उमेदवारांना घेण्यास अडचण असल्याचे सांगण्यात येत असल्याचा आरोप होत आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी उर्दू माध्यमांचे प्राथमिक शिक्षक नसल्याने विद्यार्थांचे मोठया प्रमाणात नुकसान होत आहे, तसेच मराठी माध्यमातील अनेक शिक्षकांनी एकतर्फा आंतरजिल्हा बदलीसाठी प्रस्ताव पाठविला असता जिल्हा परिषदेच्यावतीने त्यांना पदस्थापना देण्यात आल्याचा  आरोप अखिल महाराष्ट्र उर्दू शिक्षक संघटन प्रणित आंतर जिल्हा बदली उर्दू शिक्षक संघर्ष समितीच्यावतीने करण्यात आला आहे. त्यामुळे शिक्षकांना आंतर जिल्हा बदली देवून त्यांच्यावरील अन्याय दूर करण्यात यावा अशी मागणी शिक्षक संघर्ष समीतीचे शेख जाफर पटेल, शेख बिस्मिला नुरा, अ‍ॅड मतीन अहमदन खान,नाझनीन इर्शाद खान आदींच्यावतीने करण्यात आली आहे.                             प्राथमिक शिक्षकांची अशी आहे अडचण  जिल्ह्यातील अनेक तालुक्यात उर्दू माध्यमांच्या शिक्षकांचे  एसस्सी,एसटी, वीजेएनटी, एसबीसी आदी जाती अंतर्गत असलेले आरक्षीत पद रिक्त आहेत. मुस्लिम समाजात या प्रवर्गातील पात्र उमेदवारांची संख्या कमी आहे, त्यामुळे आरक्षीत असलेल्या जागी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना संधी मिळत नाही.संघटनेची अशी आहे मागणी शिक्षण विभागात ७ नोव्हेबर २००१ रोजी शासनाच्यावतीने आदेश पास करण्यात आला आहे, यात आरक्षणाची पदे उपलब्ध न झाल्यास त्या ठिकाणी खुल्या प्रवर्गातील उमेदवार घेण्यात यावे अशी तरतुद करण्यात आली आहे. आंतर जिल्हा बदलीने समावून घेताना जिल्हा परिषद ही सरळसेवेच्या जागेवर व शुन्य जेष्ठतेने समावून घेते, मग त्यांची सेवाही नविनच सुरु होते. त्यामुळे सदर शासन निर्णयाची तरतुद या आंतरजिल्हा बदलीसाठी लागू करण्यात यावी, अशी मागणी संघटनेची आहे.