शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

पेनटाकळी प्रकल्पात सुरू असलेल्या उपोषणाची चौथ्या दिवशी सांगता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 14:42 IST

Buldhana News चर्चा करून सोमवारी चौथ्या दिवशी हे उपोषण सोडविण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कहिवरा आश्रम: दुधा, ब्रम्हपूरी, रायपूर या परिसरातील शेतकऱ्यांचे पेनटाकळी धरणात उपोषण सुरू होते. आ.डॉ. रायमूलकर यांनी पेनटाकळी प्रकल्पावर जाऊन उपोषण करणाऱ्या शेतकऱ्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांच्याशी चर्चा करून सोमवारी चौथ्या दिवशी हे उपोषण सोडविण्यात आले.पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्यातून पाणी पाईपलाईनद्वारे देण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी सकाळपासून पेनटाकळी प्रकल्पाच्या पाण्यात  शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले होते. आ.डॉ.संजय रायमूलकर यांच्या मध्यस्तीने गेल्या तीन दिवसांपासून पेनटाकळी धरणात पाण्यात सुरू असलेले शेतकऱ्यांचे उपोषण सोमवारी सुटले. आ.डॉ.संजय रायमूलकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती माधवराव जाधव यांनी उपोषण करणाऱ्यांना शेतकऱ्यांना शरबत पाजून उपोषण सोडविले. पेनटाकळी धरणाचा मुख्य कालवा ० ते ११ किलोमीटर मध्ये पाईप लाईनव्दारे पाणी सोडण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. दरवर्षी शेतकऱ्यांचे कालव्याच्या पाझरणाऱ्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. मुख्य कालव्याचे अस्तरीकरणाचे काम न झाल्यामुळे कालव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी पाझरून परिसरातील शेतीचे व पिकांचे नुकसान होत होते. कालव्यामुळे दुधा, ब्रम्हपूरी, रायपूर या परिसरातील शेतकऱ्यांचे पावसाळ्यातील खरीप पिकांचे व रब्बी पिकांचे लाखो रूपयांचे नुकसान होत होते. सोमवारी जयंत पाटील यांचेशी आ.रायमुलकर यांनी चर्चा करुन या शेतकऱ्यांच्या मागणीची मंजूरी घेवून हे उपोषण सोडविले. 

टॅग्स :buldhanaबुलडाणाagitationआंदोलन