शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: मुंबईत पुन्हा मराठी- हिंदी वाद! जोपड्याचं डिलिव्हरी बॉयसोबत संतापजनक कृत्य
2
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
3
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
4
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
5
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
6
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
7
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
8
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
9
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
10
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
11
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
12
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
13
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
14
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
15
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
16
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
17
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
18
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
19
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
20
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!

पत्रकारांच्या अधिवेशनाचा समारोप 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 00:16 IST

शेगाव : संतनगरी शेगावमध्ये मराठी पत्रकार परिषदेचे पार पडलेले   ४१ वे राष्ट्रीय अधिवेशन हे पत्रकारितेसाठी प्रेरणादायी ठरणार  असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री ना.डॉ. रणजित  पाटील यांनी केले.  शेगाव येथे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या  मराठी पत्रकार परिषदेच्या ४१ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारो पीय कार्यक्रमात ते  बोलत होते. 

ठळक मुद्देसंतनगरीतील अधिवेशन पत्रकारितेसाठी प्रेरणादायी गृहराज्यमंत्री पाटील यांचे प्रतिपादन 

लोकमत न्यूज नेटवर्कशेगाव : संतनगरी शेगावमध्ये मराठी पत्रकार परिषदेचे पार पडलेले   ४१ वे राष्ट्रीय अधिवेशन हे पत्रकारितेसाठी प्रेरणादायी ठरणार  असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री ना.डॉ. रणजित  पाटील यांनी केले.  शेगाव येथे दोन दिवसांपासून सुरू असलेल्या  मराठी पत्रकार परिषदेच्या ४१ व्या राष्ट्रीय अधिवेशनाच्या समारो पीय कार्यक्रमात ते  बोलत होते.  दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनाचा रविवार, २0 ऑगस्ट रोजी   श्री संत गजानन महाराज अभियांत्रिकी महाविद्यालयामधील  सुसज्ज सभागृहामध्ये  समारोप करण्यात आला. परिषदेचे  राज्याध्यक्ष एस. एम. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या  या कार्यक्रमास  प्रमुख अतिथी म्हणून गृहराज्यमंत्री ना. डॉ. रणजित  पाटील, बुलडाणाचे आ.हर्षवर्धन सपकाळ, मराठी पत्रकार  परिषदेचे कार्याध्यक्ष सिद्धार्थ शर्मा, विश्‍वस्त किरण नाईक,  सरचिटणीस यशवंत पवार, मिलिंद आष्टीवकर, माजी अध्यक्ष  माधवराव अंभोरे, अनिल महाजन, विजय जोशी, अकोला येथील  शोएब अली मीर साहेब,  अधिवेशनाचे मुख्य संयोजक अमरावती  विभागीय सचिव तथा बुलडाणा जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळे, ज्येष्ठ  पत्रकार समाधान सावळे, डॉ. जयंतराव खेळकर यांच्यासह इतर  पदाधिकारी व मान्यवरांची व्यासपीठावर उपस्थिती होती.प्रास्ताविकामध्ये मुख्य संयोजक जिल्हाध्यक्ष राजेंद्र काळे यांनी या  अधिवेशनासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहकार्य करणार्‍या सर्वांचे  आभार व्यक्त करून संतनगरीत हे अधिवेशन घेण्याचा बुलडाणा  जिल्हा पत्रकार संघाचा मानस या माध्यमातून फलश्रुत झाल्याचे  त्यांनी सांगितले. यावेळी यशवंत पवार यांनी दोन वर्षांतील  कामकाजाचा आढावा सादर केला. आ.हर्षवर्धन सपकाळ यांनी  पत्रकारांच्या या अधिवेशनाचे कौतुक करीत पत्रकारांचे प्रश्न  सोडविण्यासाठी आपण पाठपुरावा करू असे सांगितले. तत्पूर्वी  खा. प्रतापराव जाधव, आ. बच्चू कडू यांनी उपस्थित राहून  पत्रकारांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडवून घेण्यासाठी  प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. आतापर्यंत झालेल्या सर्व अधिवेशनापेक्षा शेगावचे हे अधिवेशन  भव्य दिव्यच नव्हे, तर उत्कृष्ट नियोजन व शिस्तबद्धही होते. या  अधिवेशनाच्या माध्यमातून श्री संत गजानन महाराज संस्थांनच्या  सेवाभावाची ओळखही तमाम पत्रकारांना झाल्याचे    प्रतिपादन  मराठी पत्रकार परिषदचे राज्याध्यक्ष एस. एम. देशमुख यांनी केले.  समारोप कार्यक्रमात हे अधिवेशन यशस्वीपणे पार पाडल्याबद्दल  मराठी पत्रकार परिषदेकडून मान्यवरांच्या हस्ते आयोजक   बुलडाणा जिल्हय़ातील  सर्व पत्रकार बांधवांचा तसेच राज्य स् तरावरील काही पदाधिकारी यांचा उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल तर   बहारदार संचलन केल्याबद्दल पत्रकार गजानन धांडे, सिद्धेश्‍वर  पवार आणि पत्रकार कल्याण निधीसाठी एक लाख रुपये  दिल्याबद्दल जिल्हा कार्याध्यक्ष सुधीर चेके यांचा शिल्ड व पुष् पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. भावी अध्यक्ष तथा राज्याचे  कार्याध्यक्ष सिद्धार्थ शर्मा व राज्याध्यक्ष एस. एम. देशमुख यांनी  पत्रकार परिषदेच्या कार्याबाबत माहिती सांगितली.                  

पुढील अधिवेशन शिर्डीतमराठी पत्रकार परिषदेचे पुढील अधिवेशन शिर्डी येथे घेण्यात यावे,  असे आवाहन अधिवेशनामध्ये शनिवारी उद्घाटक सुरेश हावरे  यांनी केले होते. त्यांच्या या आवाहनाला मराठी पत्रकार  परिषदेकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. त्यामुळे पुढील  अधिवेशन शिर्डीत होण्याची शक्यता आहे.