शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
3
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
4
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
5
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
6
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
7
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
8
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
9
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
10
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
11
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
12
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
13
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
14
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
15
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
16
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
17
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
18
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
19
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
20
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
Daily Top 2Weekly Top 5

युरियासोबत शेतकऱ्यांना मायक्रोल टाॅनिक खरेदीची सक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 11:15 IST

Agriculture Sector News : युरिया खतासोबत मायक्रोल टाॅनिक घेतले तरच खत मिळेल, अशी अडवणूक करण्याचा प्रकार सुरू आहे

- सदानंद सिरसाटलोकमत न्यूज नेटवर्क   खामगाव : शेतकऱ्यांना खत विक्री करताना कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त साहित्य देऊन त्यांची आर्थिक पिळवणूक करू नये, असे निर्देश असतानाही खामगाव शहरातील काही कृषी सेवा केंद्रांमध्ये युरिया खतासोबत मायक्रोल टाॅनिक घेतले तरच खत मिळेल, अशी अडवणूक करण्याचा प्रकार सुरू आहे. ही बाब कृषी विभागाने गांभीर्याने घेणे गरजेचे झाले आहे. शेतकऱ्यांना कृषी निविष्ठा पुरेशा आणि योग्य दरात उपलब्ध कराव्यात, असा आदेश आधीच कृषी विभागाने दिला आहे. तसेच खत विक्री करताना त्यासोबत इतर कोणतीही निविष्ठा खरेदीची सक्ती करू नये किंवा लिंकिंग करू नये, तसे केल्यास गंभीर कारवाईचा इशाराही देण्यात आला. तरीही खामगाव शहरातील काही खत विक्रेते त्या आदेशाला जुमानत नसल्याचा प्रकार सोमवारी सरकी लाइन परिसरात दिसून आला. शेतकरी गोपाल चव्हाण यांनी युरिया खत मिळण्यासाठी या परिसरातील केंद्रात सोमवारी दुपारी धाव घेतली. यावेळी त्यांना युरिया खत हवे असेल तर त्यासोबत मायक्रोल नामक टाॅनिक घ्यावे लागेल, असा पवित्रा कृषी केंद्र चालकांनी घेतला. त्या टाॅनिकची किंमत ३५० रुपये आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यांना गरज नसताना टाॅनिक खरेदी करायला लावणे, हा प्रकार खामगावात सर्रासपणे सुरू झाला आहे. त्यातून शेतकऱ्यांची आर्थिक पिळ‌वणूक केली जात आहे. विशेष म्हणजे, कृषी विभागाने दिलेल्या निर्देशांचीही पायमल्ली केली जात आहे. 

खतासोबत लिंकिंग करू नये, असे कृषी सेवा केंद्र संचालकांना आधीच निर्देश दिले आहेत. तरीही असा प्रकार घडत असेल तर चौकशी केली जाईल. संबंधितांना निर्देश दिले जातील. - जी. बी. गिरी,  तालुका कृषी अधिकारी, खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावagricultureशेती