शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीने पत्ते उघडले; शिक्षक मतदारसंघासाठी सुनिल तटकरेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा
2
रवींद्र धंगेकर यांचा भाजपवर आणखी एक गंभीर आरोप; ९९६ कोटींचा निधी घेतला आणि...
3
उत्तर कोरियाच्या हेरगिरी उपग्रहाचं प्रक्षेपण अपयशी, उड्डाण करताच काही सेकंदात उडाल्या रॉकेटच्या ठिकऱ्या
4
‘’हवे तेवढे पैसे घ्या, पण मला मारू नका’’, अपघातानंतर ‘बाळा’ने दाखवला पैशांचा माज, प्रत्यक्षदर्शीचा दावा  
5
राजकोट अग्नितांडव! गेम झोनच्या मालकाचाही जळून मृत्यू, आईच्या DNA मुळे पटली ओळख...
6
माजी IAS अधिकाऱ्याच्या पत्नीच्या हत्येचे गूढ उकलले; जवळच्याच लोकांकडून दगाफटका, ३ आरोपींना अटक!
7
"युवासेनेच्या पदाधिकाऱ्याला कोस्टल रोडचे काम"; आदित्य ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर भाजपचे प्रत्युत्तर
8
आणखी एका फॅक्टरीमध्ये बॉयलरचा स्फोट, ४० कामगार होरपळले, ८ जणांची प्रकृती गंभीर
9
 प्रचारसभेवेळी राहुल गांधी झाले उकाड्याने त्रस्त, भरसभेत डोक्यावर ओतलं पाणी   
10
'कान्स'मधलं वातावरण भारावून टाकणारं होतं - छाया कदम
11
शालिमार-मुंबई एलटीटी एक्स्प्रेसमधील बंद एसीवरून प्रवाशांचा संताप
12
राज्यातील दुष्काळाच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक, परिस्थितीच्या पाहणीसाठी विभागवार समित्यांची स्थापना
13
कोस्टल रोडच्या टनेलला गळती, व्हिडिओ समोर येताच CM शिंदे 'इन अॅक्शन'; कायमस्वरुपीच्या दुरुस्तीचे आदेश!
14
WhatsApp युजर्सना खुशखबर! आता मोठे Voice मेसेज पाठवता येणार, जाणून घ्या कसे?
15
घरातून एकत्रच पळाल्या ३ मुली; पत्र वाचून कुणीही शोधण्याची हिंमत केली नाही, अखेर...
16
AAP नेत्या आतिशी यांच्याविरोधात कोर्टाने बजावले समन्स, केजरीवालही आहेत आरोपी, जाणून घ्या प्रकरण
17
ट्रेनमध्ये सीट बुक केली, तरीही उभे राहून करावा लागला प्रवास; रेल्वेला ठोठावला १३ हजारांचा दंड!
18
"यामिनी जाधवांकडून सापळेंवर कमिशनचे आरोप"; चौकशीचा ड्रामा कशासाठी म्हणत ठाकरे गटाची टीका
19
अमेरिकेतील संकट बनलं भारतासाठी संधी?; औषध उत्पादक कंपन्यांना मोठा फायदा
20
अमेरिकेत कारच्या धडकेत भारतीय विद्यार्थिनीचा मृत्यू; शिक्षण पूर्ण करुन नोकरीच्या होती शोधात

खामगांव कृषि महोत्सवाची तयारी पुर्ण; शेतकऱ्यांच्या स्वागतासाठी  रजत  नगरी सज्ज 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 1:35 PM

खामगांव : पश्चिम विदभार्तील पहिल्यांदाच खामगांवात शुक्रवार, १६ फेब्रुवारी पासून होणा-या भव्य कृषी महोत्सवाची तयारी पुर्ण झाली असून शेतक-यांच्या स्वागतासाठी खामगांव नगरी सज्ज झाली आहे.

ठळक मुद्देशनिवारी या महोत्सवाच्या उदघाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस खामगांवात येत आहेत. राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांचे प्रयत्नातून बुलढाणा सह पश्चिम विदभार्तील जिल्हयातील शेतक-यांच्या हितासाठी व मार्गदर्शनासाठी कृषी महोत्सवाचे माध्यमातून शेतक-यांना सुवर्ण संधी चालून आली आहे. शुक्रवार १६ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी पर्यंत जलंब रोडवरील पॉलीटेक्नीक कॉलेजच्या भव्य मैदानावर सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजता पर्यंत जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले.

खामगांव : पश्चिम विदभार्तील पहिल्यांदाच खामगांवात शुक्रवार, १६ फेब्रुवारी पासून होणा-या भव्य कृषी महोत्सवाची तयारी पुर्ण झाली असून शेतक-यांच्या स्वागतासाठी खामगांव नगरी सज्ज झाली आहे. तर शनिवारी या महोत्सवाच्या उदघाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस खामगांवात येत आहेत. खामगांवाच्या इतिहासात प्रथमच भव्य कृषी महोत्सवाचे आयोजन होत आहे. राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांचे प्रयत्नातून बुलढाणा सह पश्चिम विदभार्तील जिल्हयातील शेतक-यांच्या हितासाठी व मार्गदर्शनासाठी कृषी महोत्सवाचे माध्यमातून शेतक-यांना सुवर्ण संधी चालून आली आहे. शुक्रवार १६ फेब्रुवारी ते २० फेब्रुवारी पर्यंत जलंब रोडवरील पॉलीटेक्नीक कॉलेजच्या भव्य मैदानावर सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजता पर्यंत जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या प्रारंभ व प्रचार प्रसारासाठी शुक्रवारी सकाळी ११.०० वा डॉ बाबासाहेब आंबेडकर न.प.मैदान येथून भव्य ट्रॅक्टर व बैलगाडी दिंडी निघणार आहे. खामगांव मतदार संघाचे युवा आमदार अ‍ॅड. आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात निघणा-या या दिंडीला राज्याचे कृषी व फलोत्पादन मंत्री हिरवी झेंडी दाखवणार असून नंतर ही दिंडी खामगांव शहरातील प्रमुख मागार्ने मार्गक्रमण करुन समारोप कृषी महोत्सव स्थळी होणार आहे. 

मुख्यमंत्री शनिवारी खामगावात या महोत्सवाच्या उदघाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस शनिवारी सकाळी १०.३० वा येत आहेत. यावेळी राज्याचे कृषी मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांचेसह भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष आ.चैनसुख संचेती, भाजपा प्रदेश सरचिटणीस आ.डॉ संजय कुटे, अ‍ॅड. आकाश फुंडकर यांचेसह आमदार, खासदार आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. 

कृषी महोत्सवाचे आकर्षण या कृषी महोत्सवात ४०० हून अधिक स्टॉल आहेत. यामध्ये शेती विषयी माहिती, तंत्रज्ञान, बिबियाणे, सेंद्रीय शेती, सौर शेती कुंपण, शेती उत्पादने, शेती प्रक्रीया उद्योग, पशुपालन, यासह अत्याधुनिक शेतीची प्रात्यक्षिके दाखविणारे स्टॉल राहणार आहेत. शासनाच्या योजनांची माहिती याठिकाणी देण्यात येणार आहे. या कृषि महोत्सवास शेतकरी बांधवानी मोठया प्रमाणात भेट देऊन आपल्या शेतीचे उत्पादन दुप्पट करण्याचे दृष्टीने नवीन तंत्रज्ञान व शेती पुरक व्यवसाय करण्यासाठी सहभागी व्हावे असे आवाहन कृषी व फलोत्पादन मंत्री ना.भाऊसाहेब फुंडकर यांनी केले आहे.

टॅग्स :khamgaonखामगावBhausaheb Phundkarभाऊसाहेब फुंडकरKhamgaon Agro Festivalखामगाव कृषि महोत्सव