शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीने नुकसान झालेल्या शेतीपिकांना भरपाई द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 04:33 IST

या संदर्भात रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिले आहे. मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामात अतीवृष्टीने शेतकºयांचे मोठे नुकसान ...

या संदर्भात रविकांत तुपकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदन दिले आहे. मागील वर्षी खरीप व रब्बी हंगामात अतीवृष्टीने शेतकºयांचे मोठे नुकसान झाले. यावर्षी देखील खरीप हंगामात अतिवृष्टी तसेच बोगस बियाणे यामुळे दुबार-तिबार पेरणी करावी लागली. त्यातच गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. यावर्षी रब्बीतील पिके चांगली असल्याने याच पिकांकडून शेतकºयांना आशा होती. गहू, हरबरा, कांदा, आंबा, भाजीपाला यासह इतर पिके ऐन काढणीला आलेली असताना जिल्हयात १८ व १९ मार्च रोजी वादळी वाºयासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. तर काही ठिकाणी तुरळक गारपीट झाली आहे. यामुळे गहू, हरभरा, कांदा, आंबा, भाजीपाला यासह अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकºयांना या नुकसानाची भरपाई न मिळाल्यास शेतकरी पूर्णपणे हतबल होऊन आत्महत्येचा मार्गाकडे वळण्याची शक्यता आहे. या कठीण परिस्थितीत शेतकºयांना आधार देण्यासाठी तातडीने नुकसानाचे पंचनामे करुन शेतकºयांना नुकसान भरपाई द्यावी, अशी आग्रही मागणी रविकांत तुपकर यांनी केली आहे.

नुकसानाची पाहणी

‘स्वाभिमानी’चे राणा चंदन, शेख रफिक शेख करीम, राजेश गवई, महेंद्र जाधव, संतोष गवळी या पदाधिकाºयांनी मोताळा तालुक्यातील मूर्ती शिवारातील शेतीच्या नुकसानाची पाहणी केली. राणा चंदन यांनी तात्काळ मोताळा तहसीलदार समाधान सोनुने यांना फोन करून पंचनामे करण्यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली. त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे कृषी अधिकारी, तलाठी यांनी तात्काळ पंचनामे करण्यास सुरवात केली. दरम्यान, बाबुराव सोनुने यांच्या शेतातील अडीच एकर मका उद्ध्व‌स्त झाल्याने त्यांना धीर दिला.