शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

मास्क न वापरणाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांनी दिली समज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2021 11:29 IST

Buldhana collector आदेशाचे पालन करणाऱ्या नागरिक व युवकांना जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी रस्त्यावर उतरून समज दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनाबाधितांची जिल्ह्यात वाढती संख्या पाहता मास्क न वापरणाऱ्या व जमावबंदी आदेशाचे पालन करणाऱ्या नागरिक व युवकांना जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी १७ फेब्रुवारी रोजी थेट शहरात रस्त्यावर उतरून समज दिली. दरम्यान पालिका मुख्याधिकारी व तहसिलदारांना शहरी व ग्रामीण भागात जमावबंदी आदेशाची गंभीरतेने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी सकाळी जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी जमावबंदी आदेश लागू केला. सोबतच अनुषंगिक अनेक बाबी या आदेशात नमूद केल्या आहेत. पालिका, तहसिल आणि ग्रामपंचायतींनी त्यांच्या स्तरावर कारवाई करण्याचेही निर्देश त्यांनी दिले. आदेश पारित करताच त्यांनी थेट शहरातील रस्त्यावर जाऊन परिस्थितीची पाहणी केली. रस्त्याने ये-जा करणाऱ्यांना मास्क न वापरल्याप्रकरणी त्यांनी समज दिली. यासोबतच पालिका प्रशासाने मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी नियुक्त केलेले तीन पथक नेमके काय करत आहेत, याचीही पाहणी केली. यावेळी त्यांच्या समवेत तहसिलदार रुपेश खंडारे, पालिका मुख्याधिकारी महेश वाघमोडे व अन्य अधिकारी होते. पालिकेच्या तीनही पथकांनी पोलीस स्टेशन, तहसिल कार्यालय परिसर व एसबीआय चौक परिसरात मास्क न वापरणाऱ्यांना दंड केला. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी मंगळवारीही नगर पालिका परिसर, आठवडी बाजारात जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांच्या समवेत जात दुकानातील ग्राहक, दुकान मालक यांना मास्क वापरण्याबाबत समज दिली.  एका लग्न समारंभातही त्यांनी पाहणी केली.

टॅग्स :buldhanaबुलडाणाcorona virusकोरोना वायरस बातम्या