शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

थंडीत निघाला प्रवाशांचा घाम!

By admin | Updated: January 16, 2017 02:01 IST

एसटीला ‘दे धक्का’; बसचे वायर जळाले!

बुलडाणा, दि. १५- लोणारवरून बुलडाणा मार्गे भुसावळ व जळगाव जाणार्‍या बसची वायरिंग अचानक जळाल्याने बस बंद पडल्याचा प्रकार मेहकर-चिखली रोडवर हिवरा आश्रमपासून २ कि.मी. अंतरावर १५ जानेवारी रोजी सकाळी १0 वाजता घडला. प्रवाशांना एसटीला धक्का द्यावा लागल्याने बोचर्‍या थंडीत प्रवाशांचा घाम निघाला; मात्र एसटी चालू न झाल्याने सर्व प्रवाशांना रस्त्यावर उतरावे लागले. जिल्ह्यातील एसटीला ह्यदे धक्काह्ण म्हणण्याची वेळ वाहकासह प्रवाशांवर वारंवार येत आहे. भंगार एसटी बसचे प्रमाण वाढले असून, त्या बसेस सर्रास रस्त्यावर धावत असल्याने प्रवाशांनाही जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ह्यउशिरा जाईन पण एस.टी. नेच जाईनह्ण असे म्हणणार्‍या प्रवाशांची संख्या आजही मोठय़ा प्रमाणावर असल्याने, भंगार एसटीतूनही लांबचा प्रवास प्रवासी करतात. नवृत्तीच्या मार्गावर आलेल्या एसटी बसेस ग्रामीण भागातच नाहीतर माहामार्गावर सुद्धा पाठवल्या जात आहेत. त्यामुळे मध्येच एसटी बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. मेहकर आगाराची एम.एच.४0 एन.८७९३ क्रमांकाची एसटी बस सकाळी ९ वाजता लोणारवरून जळगावसाठी निघाली. ही बस लोणार, मेहकर, लव्हाळा, चिखली, बुलडाणा, मुक्ताईनगर, भुसावळ त्यांनतर जळगाव पोहचणार होती. लांबपल्ल्याची एसटी बस असतानाही त्याची वायरिंग तपासण्याची तसदी घेतली जात नसल्याने लोणार-जळगाव जाणारी एसटी बसची वायरिंग हिवरा आश्रमपासून दोन कि.मी. अंतरावर जळून गेली. अचानक वायरिंग जळाल्याने एसटी बंद पडली. तेव्हा चालकांनी प्रवाशांना एसटीला धक्का देऊन एसटी बस सुरू करण्याचा प्रयत्न केला. एसटीला धक्का देत असताना एसटी तर सुरू झाली नाही; मात्र बोचर्‍या थंडीत एसटीला धक्का देणार्‍या प्रवाशांचा चांगलाचा घाम निघाला. तेव्हा चालक व वाहकांनी सर्व प्रकार मेहकर आगाराला कळविला. कित्येक प्रवाशांना महत्वाच्या कामासाठी पुढे जायचे होते, मात्र एक तास दुसरी बस आली नसल्याने २५ ते ३0 प्रवाशांना रस्त्यावरच ताटकळत बसावे लागले. एक तासानंतर दुसरी बस प्रवाशांनी फुल्ल होऊन आली असता, त्या बसमध्ये प्रवाशांना कोंबून देण्यात आले. रस्त्यावरच अशाप्रकारचे एसटी बस वारंवार बंद पडण्याचे प्रकार घडत असल्याने प्रवाशांना एसटीचा प्रवास डोकेदु:खी ठरत आहे. भंगार बसचे प्रमाण वाढले!जिल्ह्यातील एसटी महामंडळाकडे भंगार एसटी बसेसचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागातच नाही तर लांबपल्ल्यावरसुद्धा भंगार एसटी बसेस सोडण्यात येत असल्याने बस बंद पडण्याचे प्रकार वाढले आहेत. भंगार बसेसमुळे प्रवाशांसाठी बसचा प्रवास डोकेदुखी ठरत आहे. काही ठिकाणी अचानक बसफेरी बंद केली जात असल्याने प्रवाशांची तारांबळ उडत आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या नियोजनशून्य कारभाराचा प्रवाशांना त्रास सोसावा लागत आहे.