शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या अधिका-यांना काँग्रेसचा घेराव

By admin | Updated: September 14, 2016 01:02 IST

शेतक-यांना नियमित वीज पुरवठा न दिल्यास जिल्हा नियोजन बैठकीत हल्लाबोल करण्याचा काग्रेसचा इशारा.

चिखली(जि.बुलडाणा), दि. १३ : शेतकर्‍यांना नियमित वीज पुरवठा न दिल्यास शेतकरी जिल्हा नियोजनच्या बैठकीत हल्लाबोल करतील, त्यावेळी परिणामाला सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशारा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष तथा आमदार राहुल बोंद्रे यांनी महावितरणच्या अधिकार्‍यांना दिला. चिखली मतदार संघातील दुधा परिसरातील शेतकर्‍यांसह आ.बोंद्रे यांनी, अधिकार्‍यांनी १२ सप्टेंबर रोजी घेराव घातला होता. यावेळी आ.बोंद्रे यांनी अधिकार्‍यांना नियमित वीज पुरवठय़ासाठी चांगलेच धारेवर धरले. सलग तीन वष्रे दुष्काळाची झळ सोसलेल्या शेतकर्‍यांना यावेळी काही अंशी दिलासा मिळाला आहे; मात्र सोयाबीनचे पीक ऐन भरात असताना पावसाने दडी मारल्यामुळे हाताशी आलेले पीक उद्ध्वस्त होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत धडपड करून शेतकरी पिके वाचण्यासाठी उपलब्ध जलसाधनांच्या माध्यमातून पाणी देण्याचा प्रयत्न करीत आहेत; मात्र त्यांच्या या प्रयत्नांना विद्युत कं पनीच्या गलथान कारभारामुळे अपयश येत असून, धाड वीज उपकेंद्रांतर्गत हातेडी पॉवर स्टेशन अं तर्गत येणार्‍या देवपूर, दुधा, दहीद खु., माळवंडी या गावात गत ४८ तासांमध्ये केवळ सहा तास वीज मिळाल्यामुळे परिसरातील शेतकरी त्रस्त झाले आहेत. याची गंभीरतेने दखल शेतकर्‍यांसह आ.बोंद्रे यांनी जिल्हा वीज कार्यालयात अधिकार्‍यांना घेराव घालून चांगलेच धारेवर धरले. एकीकडे मु ख्यमंत्री १२ तास अखंड वीज पुरवठा करू, अशा घोषणा करतात. प्रत्यक्षात मात्र आठवडाभरात १२ तासही शेतकर्‍यांना नियमित वीज मिळत नाही, ही बाब अत्यंत खेदजनक असून, शेतकर्‍यांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखी असल्याने वीज पुरवठय़ातील अडथळे दूर करून शेतकर्‍यांना दिवसा तून किमान आठ तास नियमित वीज द्या, अन्यथा शेतकर्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला. यावेळी जिल्हा विद्युत अधिकारी पठाडे, झिझलवार, धाड येथील अभियंता कायंदे यांनी असलेल्या त्रुटी दूर करून शेतकर्‍यांना तत्काळ वीज पुरविण्याचे आश्‍वासन दिले. यावेळी दुधा व परिसरातील शेकडो शेतकरी उपस्थित होते.