शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

आधारकेंद्रच निराधार; जिल्ह्यातील ५० टक्के शासकीय आधारकार्ड नोंदणी केंद्र बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 17:14 IST

आधारकार्ड नोंदणी केंद्राची संख्या कमी असल्याने नागरीकांचे हाल होत असल्याचे दिसून येते.  विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील ११० पैकी ४० पेक्षा अधिक शासकिय आधारसंच बंद आहे.

- योगेश फरपटखामगाव : आधारकार्ड नोंदणी केंद्राची संख्या कमी असल्याने नागरीकांचे हाल होत असल्याचे दिसून येते.  विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुलढाणा जिल्ह्यातील ११० पैकी ४० पेक्षा अधिक शासकिय आधारसंच बंद आहे. बंद पडलेले आधारकार्ड संच सुरू करण्यासाठी जिल्हा प्रशासनाची अनास्था असल्यामुळे नागरिकांंना त्रास सहन करावा लागत आहे. याकडे जिल्हाधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे. आधारकार्डला देशात अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे. आधारकार्डचा वापर 90 टक्के वाढला आहे. त्यामुळे जन्मापासून ते मृत्यू पर्यंत आधारकार्ड असणे आवश्यक झाले आहे. पूर्वी आधारकार्ड नोंदणीचे काम खाजगी कंपनीद्वारे केल्या जात असल्यामुळे शहरात अनेक आधारकार्ड नोंदणी केंद्र होते. परंतु गेल्या वर्षभरापासून खाजगी कंपनीचे आधारकार्ड नोंदणी केंद्र सरकारने बंद केले आहे. त्याएवजी शासनाने दिलेले आधारकार्ड नोंदणी संच द्वारेच आधारकार्डची नोंदणी सुरू आहे. परंतु शासनाचे आधारकार्ड नोंदणी संचाची संख्या अत्यंत कमी असल्यामुळे नागरीकांना नोंदणीसाठी, दूरुस्तीसाठी त्रास सहन करावा लागत आहे. 

४० आधारकार्ड संच आहेत बंदबुलढाणा जिल्ह्यात शासनाचे ११० आधार नोंदणी संच आहे. नोंदणी संच डीआइटी द्वारा जिल्ह्यातील महा ई सेवा केंद्र चालकांना देण्यात आले आहे. परंतु यातील ४० पेक्षा अधिक आधारसंच बंद असल्यामुळे जिल्ह्यात केवळ ७० आधारसंच सुरू आहे. त्यामुळे नागरीकांना आधारकार्ड बनविणे किंवा त्यामध्ये बदल करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे.

का आहेत आधारसंच बंद!महा ई सेवा केंद्रावर देण्यात आलेले आधारसंच बंद असल्याचे मुख्य कारण आॅपरेटर इनअ‍ॅक्टीव्ह आहे. आधारकार्ड काढण्यासाठी आॅपरेटरची आवश्यकता असते. त्याच्या अंगठ्याचे निशान लावूनच आधारकार्डला मंजुरी देण्यात येते. परंतु युआइडीआई कडून कोणतेही कारण न सांगता जिल्ह्यातील ४० ते ५० आॅपरेटर इनअ‍ॅक्टीव्ह करण्यात आले आहे. त्यामुळे या केंद्रावरील आधारकार्ड चे काम बंद आहे. इनअ‍ॅक्टीव्ह असलेले आधारकार्ड आॅपरेटर यांनी डीआइटी आणि महाआॅनलाईनच्या जिल्हा समन्वयकांशी वेळोवेळी संपर्क साधला आहे. परंतु वरीष्ठ कार्यालयातून नवीन आॅपरेटर किंवा आॅपरेटर अ‍ॅक्टीव करण्यासाठी परवानगी मिळत नसल्याचे सांगण्यात येत आहे. 

- जिल्ह्यातील आधारकार्ड केंद्राचे काही आॅपरेटर इनअ‍ॅक्टीव्ह झाले आहे. कारवाई झाल्याने काही ब्लॅकलिस्ट केले आहेत. तांत्रीक अडचणीमुळे बंद असलेले केंद्र सुरु करण्याचे काम सुरु आहे. गणेश शेवत्रे, जिल्हा समन्वयक, महाआॅनलाइन कंपनी. - जिल्ह्यातील आधारकार्ड नोंदणी केंद्र सुरळीत सुरू आहेत. ११० पैकी ९० केंद्रे सुरु आहेत. मी संबधितांशी दोन दिवसापूर्वीच चर्चा केली आहे. जी केंद्रे बंद आहेत ती सुरु करण्याबाबत सुचना देतो. - ललीत वराडे, निवासी उपजिल्हाधिकारी, बुलढाणा.

टॅग्स :buldhanaबुलडाणाAdhar Cardआधार कार्ड