शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
3
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
6
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
7
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
8
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
9
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
10
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
11
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
12
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
13
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
14
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
15
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
16
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
17
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
18
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
19
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
20
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छता ही सेवा’ लोकचळवळ व्हावी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 00:49 IST

घर,  परिसर आणि आता शहर स्वच्छतेच्या  माध्यमातून ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमाला  लोकचळवळीचे स्वरूप द्या, असे आवाहन राज्याचे कृषी त था फलोत्पादन मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी येथे केले. 

ठळक मुद्देभाऊसाहेब फुंडकर यांचे प्रतिपादन खामगाव शहरातून स्वच्छता जनजागृती रॅली

खामगाव:  घर,  परिसर आणि आता शहर स्वच्छतेच्या  माध्यमातून ‘स्वच्छता हीच सेवा’ उपक्रमाला  लोकचळवळीचे स्वरूप द्या, असे आवाहन राज्याचे कृषी त था फलोत्पादन मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर यांनी येथे केले. खामगाव नगरपालिकेच्यावतीने ‘स्वच्छता ही सेवा’ या उ पक्रमाचा शुभारंभ रविवारी करण्यात आला. यावेळी  खामगाव पालिकेत आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस् थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून  खामगाव विधानसभा मतदारसंघाचे आ. अँड. आकाश  फुंडकर, नगराध्यक्ष अनिता डवरे, उपविभागीय अधिकारी  मुकेश चव्हाण, तहसीलदार सुनील पाटील, मुख्याधिकारी  धनंजय बोरीकर, पाणीपुरवठा सभापती सतीशआप्पा दुडे,  आरोग्य सभापती राजेंद्र धनोकार,  ज्येष्ठ साहित्यिक रामदादा  मोहिते, नगरसेवक हिरालाल बोर्डे, ओम शर्मा, भाजप शहर  अध्यक्ष संजय शिनगारे, अनिता देशपांडे, जान्हवी  कुळकर्णी, शेखर पुरोहित, लक्ष्मीनारायण ग्रुपचे  तेजेंद्रसिंह  चव्हाण यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. याप्रसंगी  झाडू, टोपले, कुदळ आणि स्वच्छतेचे प्रतीक असलेल्या  शस्त्रांचे पूजन कृषी मंत्री ना. भाऊसाहेब फुंडकर आणि  मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी केले. त्यानं तर कॉलेज ऑफ मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छताविषयक  पथनाट्य सादर करून उपस्थितांची मने जिकंली. खामगाव नगरपालिकेत आणि शहरातील विविध चौकांत या  पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी  नगरसेविका भाग्यश्री मानकर, विनोद टिकार, संतोष पुरोहित,  महेंद्र रोहणकर, गणेश सोनोने यांच्यासह शहरातील विविध  सामाजिक संघटनांचे पदाधिकारी नगरपालिका अधिकारी,  कर्मचारी मोठय़ा संख्येने सहभागी होते. यावेळी मुक्तांगण,  तरुणाई, आयएमए आणि  इतर या सामाजिक संघटनेच्या  पदाधिकार्‍यांनी काही ठिकाणी स्वच्छताही केली. संचालन  वैभव डवरे, राजेंद्र झनके यांनी केले.  आभार नगराध्यक्ष   अनिता डवरे यांनी मानले.

आमदारांनी दिली स्वच्छतेची शपथ!खामगाव मतदारसंघाचे आमदार अँड. आकाश फुंडकर  यांनी ‘स्वच्छता ही सेवा’ या उपक्रमाचा शुभारंभ करताना उ पस्थित विद्यार्थी आणि संस्थांच्या पदाधिकार्‍यांना स्वच्छतेची  शपथ दिली. यावेळी शहर आणि परिसर स्वच्छ ठेवण्याचा  निर्धारही विविध सामाजिक संघटनांच्यावतीने करण्यात  आला.