शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वच्छ भारत’ अभियानाला शेगाव येथे सुरुवात

By admin | Updated: October 30, 2014 23:58 IST

अमरावती विभागीय आयुक्तांनी घेतला पुढाकार

शेगाव (बुलडाणा) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार गुरुवारी संतनगरी शेगावात अमरावती विभागाचे आयुक्त ज्ञानेश्‍वर राजुरकर व त्यांच्या सहकार्‍यांनी स्वत: हातात झाडू घेऊन स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली.यावेळी विभागीय आयुक्त ज्ञानेश्‍वर राजुरकर, जिल्हाधिकारी चिंतामण जोशी, उपविभागीय अधिकारी बाबासाहेब वाघमोडे, विकास आराखडा अधिकारी आंबेकर, तहसीलदार डॉ.रामेश्‍वर पुरी, मुख्याधिकारी के.जी. मुल्लानी, सा.बां. विभागाचे परिहार, नगराध्यक्ष बंडूबाप्पू देशमुख, प्रशासन अधिकारी डोईफोडे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपालिका व महसूल प्रशासनाच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी शहर स्वच्छतेला सुरुवात केली. यावेळी सर्वांनी स्वत: हातात झाडू व फावडे घेऊन रेल्वे स्टेशन ते गजानन महाराज मंदिर परिसरापर्यंत स्वच्छता केली. यावेळी न.प. उपाध्यक्ष ज्योती मुंधडा, नगरसेवक शरद अग्रवाल, किरण देशमुख, राजू वाघ, सुनीता कलोरे, कमलाकर चौहान, राजू चुलेट आदींची उपस्थिती होती. या अभियानात नगरपालिकेच्या सर्व शाळांचे विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. एका दिवसात संपूर्ण शहराची स्वच्छता शक्य नसली तरी स्वच्छतेचा संदेश सर्वत्र पोहोचावा, हा यामागील उद्देश असून, नागरिकांनी शहराच्या स्वच्छतेसाठी न.प.ला सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी मुख्याधिकारी मुल्लानी यांनी केले.