शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

संघर्ष समितीने मोजणीचे काम पाडले बंद!

By admin | Updated: April 6, 2017 00:17 IST

मेहकर : समृद्धी महामार्गाविषयी शासनाकडून शेतकऱ्यांची दिशाभूल होत असून, नवीन मूल्यांकनानुसार मोबदला मिळत नसल्याने संघर्ष समितीच्यावतीने महामार्गाच्या मोजणीचे काम बंद पाडले.

समृद्धी महामार्गाविषयी शासनाने दिशाभूल केल्याचा आरोपमेहकर : नागपूर ते मुंबई हा समृद्धी महामार्ग बुलडाणा जिल्ह्यातून जात आहे. या महामार्गात शेकडो शेतकऱ्यांच्या हजारो एकर जमिनी जात आहेत; मात्र शेतकऱ्यांना त्यांच्या शेतजमिनीचा योग्य मोबदला मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष व्यक्त होत आहे.समृद्धी महामार्गाविषयी शासनाने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने पाळली नसून शेतकऱ्यांची शासनाकडून एकप्रकारे दिशाभूल होत असून, नवीन मूल्यांकनानुसार मोबदला मिळत नसल्याने संघर्ष समितीच्यावतीने नितीन पिसे व त्यांच्या सहकाऱ्यांनी फर्दापूर येथे ५ एप्रिल रोजी समृद्धी महामार्गाच्या मोजणीचे काम बंद पाडले असून, जोपर्यंत शेतकऱ्यांच्या जमिनीचा योग्य मोबदला मिळणार नाही, तोपर्यंत मोजणी सुरु करु देणार नाही, असा तीव्र इशारा नितीन पिसे यांनी यावेळी दिला.बुलडाणा जिल्ह्यातून जवळपास ८२ किलोमीटरचा हा महामार्ग जात आहे. दोन महिन्यांपासून संयुक्त मोजणीचे काम लोणार तालुक्यातील शिवणी पिसा येथे सुरु होते. त्यावेळी आठ दिवसांमध्ये मूल्यांकन देऊ, असे आश्वासन संबंधित अधिकाऱ्यांनी दिले होते, तर रेडिरेकनरच्या दरामध्ये २५ टक्के वाढ करुन मोबदला जास्त देण्याचे आश्वासनही दिले होते; मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्यापपर्यंत मोबदला मिळालेला नाही, तर संबंधित शेतकऱ्यांना कोणतीच माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र भावना उमटत आहेत, तर फर्दापूर येथे ९०० मीटरच्या संयुक्त मोजणीचे काम ५ एप्रिलला सुरु करण्यात आले असता, संघर्ष समितीचे अध्यक्ष नितीन पिसे व जवळपास १०० ते २०० शेतकऱ्यांनी सदर काम अडविले. अशावेळी मोजणी अधिकाऱ्यांनी पोलीस विभागाला पाचारण केले. यावेळी पोलीस व संघर्ष समितीचे सदस्य यांच्यामध्ये शाब्दीक बाचाबाची झाली. तर जमिनी महामार्गात जात आहेत, त्या जमिनीचा पाहिजे तसा मोबदला मिळत नाही. शेतकरी रस्त्यावर येऊन देशोधडीला लागत आहेत. अशा बिकट परिस्थितीत शेतकऱ्यांची बाजू समजून न घेता संबंधित अधिकारी पोलिसांना बोलावून शेतकऱ्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप नितीन पिसे यांनी केला आहे. जोपर्यंत योग्य मोबदला मिळणार नाही तोपर्यंत मोजणी करु देणार नाही, असा खणखणीत इशारा नितीन पिसे यांनी यावेळी दिला. यावेळी संयुक्त मोजणी पथकाचे भू-मापन अधिकारी मांडवे, रस्ते विकास मंडळाचे लांडे, कृषी सहायक कंकाळ, तलाठी पंढरे, तसेच फर्दापूर येथील दामुअण्णा गाडेकर, संदीप गाडेकर, संघर्ष समितीचे नितीन पिसे, संदीप पिसे, परमेश्वर पिसे, नारायण देशमुख, संतोष टेकाळे, डिगांबर मुंढे, नारायण दांदडे, समाधान सुरुशे, नितीन देशमुख, पांडुरंग गायकवाड, गजानन सरोदे व परिसरातील बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)