शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
2
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
3
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
4
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
5
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
6
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
7
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
8
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
9
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
10
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
11
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
12
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
13
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
14
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
15
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
16
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
17
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
18
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
19
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
20
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सातगाव भुसारीत युवकांच्या दोन गटात हाणामारी

By संदीप वानखेडे | Updated: April 27, 2024 18:24 IST

१८ आरोपींना अटक : पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने टळला अनर्थ.

पिंपळगाव सराई : रायपूर पाेलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या सातगाव भुसारी येथे किरकाेळ कारणावरून युवकांच्या दाेन गटात २६ एप्रिल राेजी रात्री तुंबळ हाणामारी झाली. पेट्रोलिंग करीत असलेल्या पाेलिसांच्या ही बाब लक्षात येताच दंगाकाबू पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने काही मिनिटातच गावात दाखल हाेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. पाेलिसांनी रात्रभर शाेधमाेहीम राबवत १८ जणांवर गुन्हे दाखल करून त्यांना अटक केली.

सातगाव भुसारी येथे किरकाेळ कारणावरून दाेन गटात रात्री ९.३० वाजता हाणामारी झाली. युवकांच्या दाेन गटाने एकमेकांवर लाठ्याकाठ्याने हल्ला केला. ही बाब गावातच पेट्रोलिंग करीत असलेल्या पाेलिसांच्या निदर्शनास आली. त्यांनी तातडीने वरिष्ठांना माहिती दिली. वरिष्ठांच्या आदेशाने तातडीने दंगाकाबू पथक, रायपूर आणि चिखली येथील पाेलिसांना घटनास्थळावर पाचारण करण्यात आले. पथक दाखल हाेताच गावात मध्यरात्री आराेपींची शाेधमाेहीम राबविण्यात आली. पाेलिसांनी रात्रीतूनच १८ आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक सुनील कडासने, अपर पोलिस अधीक्षक महामुनी, उपविभागीय पोलिस अधिकारी सुधीर पाटील यांच्या मार्गदर्शनात रायपूर ठाणेदार दुर्गेश राजपूत व पोलिस स्टाफ दंगाकाबू पथक बुलढाणा, पो. स्टे. चिखली व धाड पोलिस स्टाफ यांनी केली.

आराेपींमध्ये यांचा समावेशपाेलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या आराेपींमध्ये विशाल रमेश गाडे, अमोल दत्तात्रय भुसारी, युवराज संजय काळे, ऋषिकेश अनिल भुसारी, अंकलेश गजानन भुसारी, सागर राजेंद्र भुसारी, पंकज दिलीप भुसारी, विशाल गजानन ढगे, ऋषिकेश संजय सोनाळकर, रवींद्र गणेश वाघ, स्वप्नील संजय मोरे, संजय सुगदेव मोरे, राहुल राजू मोरे, सूरज अरुण जाधव, सागर वसंता जाधव, गणेश सुरेश जाधव, राहुल प्रकाश इंगळे, प्रवीण सखाराम हिवाळे व सर्व रा. सातगाव भुसारी यांचा समावेश आहे. 

टॅग्स :buldhanaबुलडाणा