शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

मासिक सभेतील उपस्थितीवरून उपसरपंच, सरपंच पित्यात हाणामारी

By संदीप वानखेडे | Updated: September 28, 2022 18:31 IST

उपसरपंचाचा पाडला दात तर सरपंच पित्याला घेतला चावा: परस्परांविरुद्ध गुन्हे दाखल

डोणगाव (बुलढाणा): ग्रामपंचायत मासिक सभेत उपस्थित राहण्यावरून डाेणगाव येथून जवळच असलेल्या वरुड येथे उपसरपंच आणि सरपंचाच्या पित्यामध्ये तुंबळ हाणामारी झाली़ एवढेच नव्हे तर सरपंच पित्याने उपसरपंचाचा दात पाडला़ यावेळी उपसरपंचाने सरपंच पित्याला चावा घेतला़ त्यानंतर दाेन्ही गटात हाणामारी झाली़ ही घटना २७ सप्टेंबर राेजी घडली़ या प्रकरणी डाेणगाव पाेलिसांनी परस्परविराेधी तक्रारीवरून दाेन्ही गटाच्या ८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

ग्राम वरुड येथील ग्रामपंचायत कार्यालयात २७ सप्टेंबर राेजी मासिक सभा सुरू हाेती़ त्यात सर्व ग्रामपंचायत सदस्य व सरपंच बसलेले असताना उपसरपंच कुंडलिक भिका राठोड यांनी सरपंचांचे वडील महादेव माणिकराव वानखेडे यांना ग्रामपंचायतमध्ये येण्यास मज्जाव केला़ त्यामुळे वानखेडे यांनी  कुंडलिक राठोड यांना मारहाण केली़ यामध्ये राठाेड यांचा एक दात पडला तर डाव्या हाताच्या खांद्यावर चावा घेतला व त्यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली़ या प्रकरणी राठाेड यांच्या फिर्यादीवरून अतुल वानखेडे, गोपाल वानखेडे, महादेव वानखेडे, जगदीश पवार, श्रीचंद पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ 

सरपंचांचे वडील महादेव वानखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ग्रामपंचायतमधील मासिक मिटिंग संपल्यानंतर त्यांचा मुलगा हा ग्रामपंचायतमध्ये हजर हाेता़ त्यावेळी महादेव वानखेडे हे पोखरा समितीचे कृषि सहायक व समूह सहायक यांच्या सोबत ग्रामपंचायतमध्ये आले असता कुंडलिक राठोड उपसरपंच हे दारू पिऊन ग्रामपंचायतमध्ये बसलेले होते़ तेव्हा त्यांनी आमची मिटिंग सुरू आहे, आत येऊ नका असे सांगून ग्रामपंचायतमध्ये येण्यास मज्जाव केला़  त्यावेळी सरपंच मुलाने आत येऊ द्या, असे सांगितले़ त्यामुळे दाेन्ही गटात वाद झाला़ या वादात कुंडलिक राठोड याने महादेव वानखेडे यांना चावा घेतला़ तसेच इतरांनी त्यांच्या मुलाला लाेटपाेट केली, असे फिर्यादीत म्हटले आहे़  महादेव वानखेडे यांच्या फिर्यादीवरून कुंडलिक राठोड, दिलीप राठोड, तुकाराम पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :buldhanaबुलडाणा