शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
4
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
5
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
6
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
7
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
8
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
9
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
10
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
11
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
12
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
13
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
14
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
15
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
16
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
17
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
18
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
19
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
20
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
Daily Top 2Weekly Top 5

शहर प्लास्टिकमुक्तीचा संकल्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:24 IST

लोणार:  जागतिक पर्यटनस्थळ लोणार येथे अविघटनशील प्लास्टिक पिशव्यांमुळे कचर्‍याचे साम्राज्य वाढीस लागले आहे. यामुळे नगराध्यक्ष भूषण मापारी व मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी पुढाकार घेत बाजारपेठेत  कापडी पिशव्या नागरिकांनी वापराव्यात म्हणून जनजागृती  उपक्रम स्वातंत्र्यदिनी करण्याचा निर्धार केला असून, शहर प्लास्टिकमुक्त करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देलोणार नगरपालिकेचा पुढाकार स्वातंत्र्यदिनी राबविणार उपक्रम

किशोर मापारी । लोकमत न्यूज नेटवर्कलोणार:  जागतिक पर्यटनस्थळ लोणार येथे अविघटनशील प्लास्टिक पिशव्यांमुळे कचर्‍याचे साम्राज्य वाढीस लागले आहे. यामुळे नगराध्यक्ष भूषण मापारी व मुख्याधिकारी विजय लोहकरे यांनी पुढाकार घेत बाजारपेठेत  कापडी पिशव्या नागरिकांनी वापराव्यात म्हणून जनजागृती  उपक्रम स्वातंत्र्यदिनी करण्याचा निर्धार केला असून, शहर प्लास्टिकमुक्त करण्यात येणार आहे.जागतिक पर्यटनस्थळ लोणार सरोवर शहराला भेडसावणारा एक भेसूर चेहरा म्हणजे शहरात फोफावणारा प्लास्टिक कचरा आहे. गेल्या काही महिन्यात शहरातील जवळपास सर्वच प्रकारच्या विक्रेत्यांकडून प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रासपणे केला जात आहे. रोज जमा होणार्‍या या लाखो प्लास्टिक पिशव्या कचर्‍यात जाऊन भटक्या प्राण्यांच्या आरोग्याला धोकादायक ठरत आहेत. याबाबत  लोणार नगर परिषदेने वेळोवेळी प्लास्टिक पिशवी बंदीबाबत पत्रे पाठवून माहिती दिली तसेच  त्याबाबत पोस्टर्स लावले असले, तरी विक्रेत्यांच्या अंमलबजीवणीचा अभाव व  ग्राहकांची मागणी व सोय पाहता विक्रेत्यांनी  प्लास्टिक पिशव्यांचा वापर सुरूच ठेवला असल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे. त्यामुळे फक्त भौतिक सुख-सोयी निर्माण होतील; पण शहराच्या सौंदर्याला व आरोग्याला धोकादायक ठरणार्‍या प्लास्टिकमुक्तीची प्रभावी अंमलबजावणी कधी होणार व स्वच्छ भारत कसा होणार, हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. कापडी पिशव्यांचा वापर अनिवार्य केला असताना त्या वापरासाठी कोणीही पाहिजे तितका धजावत नाही. जो तो प्लास्टिक पिशव्यांमध्ये साहित्य, वस्तू नेण्यालाच प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे संपूर्ण शहराला प्लास्टिक प्रदूषणाचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.  प्लास्टिक पिशव्या अविघटनशील असल्यामुळे जनावरांच्या पोटात गेल्यास रवंथ प्रक्रियेत व पचनक्रियेत अडथळा निर्माण होऊन पचनक्रियेचे आजार होतात. पिशव्या पोटातील अन्नाला चिटकून राहिल्याने अन्नाचे पचन होत नाही, अशा जनावरांचा मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्वोच्च न्यायालयाने प्लास्टिक पिशव्या वापराचे निकष व नियम ठरवून दिले आहेत. तरीही शहरातील हातगाड्या व दुकानांमध्ये ५0 मायक्रॉनपेक्षा कमी जाडी असलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर सर्रासपणे होत आहे.

कायदा फक्त नावापुरता?पर्यावरणाला धोका असल्याने शासनाने कॅरिबॅग वापरावर कडक निर्बंध आणले आहेत. त्यासाठी कायदाही केला; पण त्याची अंमलबजावणी शून्य आहे. प्लास्टिक कॅरिबॅगमुळे आरोग्याला धोका, पावसाळ्यात तुंबणारी गटारे यांची नेहमी चर्चा असते; पण यासाठीचा कायदा करण्यापलीकडे शासनाने ठोस पावले उचललेली नाहीत. लाल, पिवळ्या व काळ्या रंगातील प्लास्टिक कॅरिबॅग विक्री व्यवसाय शहरामध्ये चांगलाच फोफावला आहे. 

कापडी पिशव्यांचा अपूर्ण पुरवठाग्राहकांना वस्तू विक्री केल्यास कॅरिबॅग द्यावीच लागते. त्याला पर्याय म्हणून कागदी अथवा कापडी पिशव्यांचा बाजारपेठेत अपूर्ण पुरवठा असल्याचे विक्रेत्यांचे म्हणणे आहे. यामुळे भाजीविक्रेता, फळविक्रेता यांच्याकडून सर्रास प्लास्टिक कॅरिबॅगचा वापर होताना दिसतो.

यूज अँण्ड थ्रोची क्रेझ कौटुंबिक सोहळ्यातही यूज अँण्ड थ्रो म्हणून येणार्‍या प्लास्टिकचे ग्लास, कप, वाटी, ताट, चमचे याचा वापर वाढला आहे. त्यासाठी वापरले जाणारे प्लास्टिक आरोग्यासाठी हानिकारक असून, ते कर्करोगासारख्या आजारांना कारणीभूत ठरणारे असते.