शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

संपामुळे नागरिकांची कोंडी

By admin | Updated: March 24, 2015 01:08 IST

डाक सेवा झाली होती विस्कळीत; बाराव्या दिवसानंतर चर्चेच्या आश्‍वासनाने आंदोलन मागे.

पातुर्डा (जि. बुलडाणा): अखिल भारतीय ग्रामीण डाक सेवक संघटनेच्यावतीने १0 मार्चपासून विविध मागण्यांसाठी सुरू असलेला बेमुदत संप अखेर शनिवारी १२ व्या दिवशी चर्चेच्या आश्‍वासनानंतर मागे घेण्यात आला; मात्र एकूणच या संपामुळे ग्रामीण भागात डाक सेवा ठप्प झाली होती. ग्रामीण डाक सेवकांना खात्यात समाविष्ट करा, त्यांना सर्व विभागीय सेवा द्याव्यात, ग्रामीण डाक सेवकांच्या सेवा-शर्ती संरचनासंबंधी न्यायाधीश समितीचे गठण करा, डाक विभागाच्या कापोर्रेशन प्रस् तावाला टास्क फोर्सला रोखा आदी मागण्यांसाठी हा बेमुदत संप संघटनेने १0 मार्चपासून पुकारला होता. देशभर संपाला प्रतिसाद मिळाला. २0 मार्चपयर्ंत या संपाबाबत कोणताही यशस्वी तोडगा न निघाल्याने हा बेमुदत संप सुरूच होता. या बेमुदत संपामुळे ग्रामीण भागातील टपाल वितरण सेवा संपूर्णत: कोलमडली होती. अखेर आंदोलन मागे घेतल्यास चर्चेची तयारी दाखविण्यात आल्याने २१ मार्च रोजी आंदोलन मागे घेण्यात आले. त्यामुळे ग्रामीण भागातील डाक सेवा पूर्वपदावर येणार आहे. ग्रामीण भागात डाक विभागाशिवाय दुसरी बँक किंवा इतर सुविधा नसल्याने ग्रामीण भागातील सर्व व्यवहार डाक विभागावरच अवलंबून असतात, मात्र डाक सेवकांनी आपल्या विविध प्रलंबित व न्याय्य मागण्यांबाबत संपाचे आंदोलन पुकारल्याने सर्व व्यवहार विस्कळीत झाले होते; मात्र १२ व्या दिवसाअखेर का होईना, डाक सेवकांच्या मागण्यांबाबत वरिष्ठांनी चर्चा करून मागण्या निकाली काढण्याबाबत आश्‍वासन दिल्याने हा संप मागे घेण्यात आला. आंदोलनाला आलेले यश पाहता पातुर्डा व परिसरातील ग्रामीण डाक सेवकांकडून मागण्या पूर्ण होत असल्याचे पाहून ग्रामस्थांमध्ये आनंदो त्सवसुद्धा साजरा करण्यात आला.