जानेफळ (बुलडाणा) : मेहकर तालु्क्यातील पार्डी येथे पाणीटंचाईचा आढावा घेण्याकरिता गेलेल्या अधिकाऱ्यांना गावकऱ्यांनी मंगळवारी सकाळी घेराव घातला असून, जोपर्यंत गावातील पाणीटंचाईची समस्या सुटणार नाही, तोपर्यंत गावाबाहेर जावू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. १९ मे रोजी गावातील सावित्री सहदेव घुगे ही महिला पाणी भरण्यासाठी गेली असता विहिरीत पडून मृत्यू झाला होता. त्यामुळे गावातील पाणीटंचाईचा आढावा घेण्याकरिता उपविभागीय अधिकारी नीलेश अपार, गटविकास अधिकारी पवार,उपअभियंता खिल्लारे गावामध्ये गेले. अधिकारी गावामध्ये ग्रामस्थांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला असून, जोपर्यंत गावातील पाणीटंचाईची समस्या सुटणार नाही, तोपर्यंत गावाबाहेर जावू देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांनी पोलिसांना बोलाविले असून, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
एसडीओ, बीडीओंना गावक-यांचा घेराव
By admin | Updated: May 23, 2017 18:08 IST