बुलडाणा : नाबार्डच्यावतीने जिल्ह्यात६७५ गावांमध्ये पाणी हेच जीवन हाउपक्रम जलजागृती संदर्भात राबविण्यात येणार आहे. हा उपक्रम यशस्वीकरण्यासाठी५२ जलदूतांची निवड करण्यात आली असून प्रत्येक तालुक्यत दोन टिमकाम करणार आहे. या कृषी जलदूतांचा प्रशिक्षण कार्यक्रम बुधवारी आयोजितकरण्यात आला होता. प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारीशिवानंद टाकसाळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नाबार्डचे जिल्हाप्रबंधक सुभाष बोंदाडे, अग्रणी बँक जिल्हा व्यवस्थापक प्रभाकर श्रोते,समन्वयक दिलीप जगताप, मुख्य प्रशिक्षक वैशाली केनकर, अरूण भिडे आदीउपस्थित होते.
बुलडाण्यात ५२ जलदूतांची निवड
By admin | Updated: May 4, 2017 14:16 IST