शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘महा-ऑनलाइन’मध्ये चिखली तहसील जिल्हय़ात आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2017 00:33 IST

चिखली : महा-ऑनलाइन प्रक्रियेद्वारे केवळ दोन महिन्यांतच विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशासह इतर बाबींसाठी आवश्यक दाखल्यांसह नागरिकांना लागणारे विविध १0 हजार दाखले व प्रमाणपत्न वितरित करत चिखली तहसील कार्यालयाने या सुविधेत जिल्हय़ात आघाडी घेतली आहे. 

ठळक मुद्देदोन महिन्यांत तब्बल दहा हजार दाखले वितरितजून व जुलै महिन्यात १0 हजार ३0 दाखले वितरित

लोकमत न्यूज नेटवर्कचिखली : महा-ऑनलाइन प्रक्रियेद्वारे केवळ दोन महिन्यांतच विद्यार्थ्यांना शाळा प्रवेशासह इतर बाबींसाठी आवश्यक दाखल्यांसह नागरिकांना लागणारे विविध १0 हजार दाखले व प्रमाणपत्न वितरित करत चिखली तहसील कार्यालयाने या सुविधेत जिल्हय़ात आघाडी घेतली आहे. नव्या शैक्षणकि वर्षाला सुरुवात होताना उत्पन्नाचा दाखला, राष्ट्रीयत्व व अधिवास प्रमाणपत्न, सर्वसाधारण शपथपत्न, जातीचा दाखला, शेतकरी प्रमाणपत्र, भूमिहीन प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्र असे विविध दाखले व प्रमाणपत्न मिळविण्यासाठी विद्यार्थी व पालकांची धावाधाव सुरू असते. त्यातून शासकीय कार्यालयात चकरा माराव्या लागतात. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ऑनलाइन व्यवस्था करीत हे दाखले मिळवण्याची सुविधा उपलब्ध केली आहे. दरम्यान येथील तहसील कार्यालयातील सेतू सुविधा केंद्र बंद झाल्यानंतर केवळ ‘महा ई-सेवा’ आणि ‘आपले सरकार’ या बेव पोर्टलवर जाऊन संबंधित अर्ज भरून दाखले व प्रमाणपत्र मिळविण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यानुषंगाने सर्व विद्यार्थी व पालकांची गरज लक्षात घेता, तसेच शाळा-महाविद्यालय प्रवेश या दाखल्यांमुळे थांबू नये, यासाठी तहसीलदार मनीष गायकवाड व त्यांच्या चमूने जातीने तालुक्यातील सर्व महा ई-सेवा केंद्रांना भेटी देऊन उचित मार्गदर्शन करीत विविध दाखले व प्रमाणपत्रांसाठी आलेल्या अर्जांवर जलदगतीने कारवाई केल्याने तालुक्यात दोन महिन्यांच्या कालावधीत तब्बल १0 हजारांच्यावर विविध दाखले व प्रमाणत्रांचे वितरण झाले आहे.  चिखली तालुक्यात आजरोजी एकूण २८ महा ई-सेवा केंद्रांद्वारे ही सुविधा उपलब्ध आहे. शिवाय सामान्य जनतेला ‘आपले सरकार’ या वेब पोर्टलवरूनदेखील नोंदणी करून स्वत: दाखले मिळविता येतात. ऑनलाइन पद्धतीने अर्जदाराला प्रमाणपत्न व दाखलानिहाय शुल्क भरावे लागते. ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर किती दिवसात दाखला वा प्रमाणपत्न मिळेल, याची मुदत आधीच निश्‍चित करण्यात आली आहे. दाखला वा प्रमाणपत्रनिहाय ही मुदत वेगवेगळी आहे. याबाबत जनतेला कोणतीही तक्रार वा अडचण उद्भवल्यास नागरिकांनी नायब तहसीलदार आर.एस. कानडजे, सेतू लिपिक नीरज काकडे, रूपेश सोनवाल यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार मनीष गायकवाड यांनी केले आहे. 

जून व जुलै महिन्यात १0 हजार ३0 दाखले वितरिततहसीलदार मनीष गायकवाड यांच्या नियोजनाने चिखली तहसील कार्यालयामार्फत जून व जुलै महिन्यात ऑनलाइन पद्धतीने १0 हजार ३0 अर्ज जलदगतीने वितरित केले आहेत. यामध्ये नॉन क्रिमिलेअर १६७२, उत्पन्न प्रमाणपत्र ४८४५, वय-राष्ट्रीयत्व आणि अधिवास १८६३, जातीचे दाखले १३१३, शेतकरी प्रमाणपत्र ३0२, भूमिहीन प्रमाणपत्र ८, तसेच o्रावण बाळ सेवा राज्य नवृत्ती वेतन योजनेचे ३ प्रमाणपत्र, असे एकूण १0 हजार ३0 प्रमाणपत्रांचे वितरण करून चिखली तहसील कार्यालयाने ‘ऑनलाइन’ पद्धतीने अर्ज वितरण करण्यात आघाडी मिळविली आहे.