बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकारी दीपा मुधोळ यांची पुणे येथे महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प संचालकपदी बदली झाली आहे. त्यांच्या जागी बी.जी. पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुधोळ यांनी १६ जानेवारी २0१५ मुख्य कार्यपालन अधिकारी पदाचा पदभार घेतल्यानंतर प्रभावी कार्यप्रणालीचा ठसा उमटविला. ह्यबेटी बचाओ बेटी पढाओह्ण, अभियान जिल्हाभर पोहोचविण्यासाठी त्यांची धडपड उल्लेखनीय होती. प्रशासकीय कामामध्ये पारदर्शकता व तत्काळ निर्णय ही त्यांची हातोटी असल्याने कुठलाही वाद न होता त्यांची कारकीर्द उत्तम ठरली. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र अभियानामध्येही बुलडाण्याचा लौकिक वाढला पाहिजे, यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा करून प्रत्यक्ष सहभागही घेतल्यामुळे आज जिल्हा परिषद शाळांमध्ये डिजिटल क्रांती अवतरली आहे. प्रशासकीय कामांसोबतच महिला व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांसोबत संवाद कायम ठेवत प्रत्यक्ष कृतियुक्त सहभाग घेतल्यामुळे त्या लोकप्रिय अधिकारी ठरल्या होत्या. दरम्यान, शुक्रवारी त्यांच्या बदलीची माहिती होताच अनेक राजकीय पदाधिकारी व नेत्यांनी त्यांची बदली थांबविण्यात यावी, यासाठी पालकमंत्र्यांपर्यंंत धाव घेतली होती.
मुख्य कार्यपालन अधिकारी मुधोळ यांची बदली
By admin | Updated: April 29, 2016 02:08 IST