शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती शाहू महाराज विधवा निराधार शिष्यवृत्ती योजनेस प्रारंभ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2019 15:11 IST

खामगाव तालुक्यातील रामनगर ग्रामपंचायतीने ‘छत्रपती शाहू महाराज विधवा निराधार शिष्यवृत्ती योजना’ राबविण्यास सुरूवात केली आहे.

- अनिल गवईलोकमत न्यूज नेटवर्कखामगाव: समाजातील विधवा आणि त्यांच्या पाल्यांना मदत व्हावी आणि त्यांना सन्मानाने जगता यावे, या एकमेव उद्देशातून खामगाव तालुक्यातील रामनगर ग्रामपंचायतीने ‘छत्रपती शाहू महाराज विधवा निराधार शिष्यवृत्ती योजना’ राबविण्यास सुरूवात केली आहे. स्वातंत्र्यदिनापासून रामनगर ग्रामपंचायतीच्या या योजनेचा लाभ दिल्या ग्रामपंचायतच्यावतीने दिल्या जात आहे.रामनगर येथील गरजू विधवा निराधार असलेल्या महिला तसेच त्यांच्या मुलांना शालेय शिक्षणात मदत व्हावी, या प्रमुख उद्देशातून  छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत प्रत्येकी ११०० रुपयांची तरतूद ग्रामपंचायतीच्यावतीने करण्यात आली. तसा ठराव ग्रामपंचायतीत सर्वानुमते मंजूर करण्यात आला. त्यानंतर ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवित स्वातंत्र्यदिनापासून गावातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिल्या जात आहे.  दरम्यान, स्वातंत्र्यदिनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले. यावेळी तंटामुक्ती अध्यक्ष शत्रूघून बावणे, शाळा समिती अध्यक्ष महेंद्रशिंह राठोड,  ग्रामपंचायत सदस्य गौतम शेगोकार, मुख्याध्यापक रमेश जुमळे यांचे हस्ते शाळेत १४ व्या वित्त आयोगांतर्गत १.२५ लक्ष रुपये किंमतीचे शौचालय भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सरपंच उपसरपंच सर्वस्वी ग्रामपंचायत आजी माजी सदस्य तथा गावकरी मंडळी त्याचप्रमाणे कर्मचारी उपस्थतीत होते. स्वातंत्र्यदिनी शिष्यवृत्तीचे वितरणस्वातंत्र्य दिनी  सागर श्रीराम खंडागळे या विद्यार्थ्याचा सांभाळ करणाºया त्याच्या आजीस ही शिष्यवृत्ती सरपंच दुर्गाताई रवी महाले तर रोशन रमेश मुंडाले या विद्यार्थ्याच्या आईस सचिव ढोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. त्याचप्रमाणे गावातील महादेव मेसरे या विद्यार्थ्यांच्या आईस पशुसंवर्धन अधिकारी डॉ. शेळके यांनी शिष्यवृत्तीची रक्कम प्रदान केली. कार्यक्रमाच्या सुरूवातीला भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन ग्रामपंचायत सदस्य शिवहरी सोळंके यांनी केले. तर ध्वजपूजन माजी पोलीस पाटील रघुनाथ महाले यांनी तर ध्वजारोहण सरपंच दुगार्ताई रवी महाले यांनी केले.

 समजातील विधवा, निराधार आणि त्यांच्या पाल्यांना मदत व्हावी यासाठी ग्रामपंचायत स्तरावर छत्रपती शाहू महाराज विधवा निराधार शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. स्वातंत्र्यदिनापासून या योजने सुरूवात केली आहे.-दुर्गाताई महालेसरपंच, रामनगर ता. खामगाव.

टॅग्स :khamgaonखामगावgram panchayatग्राम पंचायत