शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

निराधारांच्या मदतीचे धनादेश केले परत!

By admin | Updated: September 20, 2016 00:21 IST

चिखली येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँकेच्या व्यवस्थापकाचा प्रताप.

चिखली(जि. बुलडाणा), दि. १९ : येथील विदर्भ कोकण ग्रामीण बॅँकेचे व्यवस्थापक पुन्हा एकदा आपल्या आडमुठेपणामुळे चर्चेत आले असून, यावेळी केलेल्या प्रतापामुळे तहसीलमार्फत आलेल्या निराधारांच्या मदतीचे धनादेश वेळेवर वटविल्या गेले नाहीत. परिणामी, त्याचा फटका लाभार्थ्यांना बसला असून, संजय गांधी निराधार योजनेतील वृद्ध महिला, पुरुष यांना नाहक बँकेचा उंबरठा झिझवावा लागत आहे.विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे नाव फेब्रुवारी २0१३ मध्ये बदलून विदर्भ कोकण क्षेत्रीय ग्रामीण बँक, असे झाले आहे. या बँकेकडे असलेल्या संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांसंदर्भाने तहसील विभाग गेल्या अनेक वर्षांपासून व्यवहार करत असून, बँकेचे नाव बदलले असतानाही यापूर्वी विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँक या नावानेच तहसील विभाग व्यवहार करत आहे. त्यानुसार तहसीलच्या संजय गांधी निराधार विभागाच्या शिपाई महिला ५५५ लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यासाठी २ लाख ६२ हजार २00 रुपयांचे एकूण तीन धनादेश घेऊन गेल्या होत्या; मात्र ऐनवेळी बँकेचे व्यवस्थापक बोराडकर यांनी बँकेत चेक घेऊन आलेल्या महिलेला चेक परत करून तुमच्या यादीतील नावे व बँकेचे नाव चुकीचे आहे. आम्हाला कॉम्प्युटरमधील नावाचा डाटा पेनड्राईव्हमध्ये भरून द्या, चूक झाली तर तहसील जबाबदार राहील, असे सुनावले. बँक व्यवस्थापकाच्या या निर्णयामुळे योजनेतील वृद्ध महिला, पुरुष यांची कुचंबना झाली असून, अनुदानासाठी बँकेचा उंबरठा झिझविणार्‍या इसरूळ, मंगरूळ, अमोना, शेळगाव आटोळ, कोनड, पिंपळवाडी, मिसाळवाडी, देऊळगाव घुबे, तेल्हारा, एकलारा येथील लाभार्थ्यांना ऐन सणासुदीच्या काळात वेळेवर पैसे न मिळाल्याने उपासमारीची वेळ येवून ठेपली आहे. विदर्भ कोकण ग्रामीण बँकेमार्फत तालुक्यातील इसरूळ, मंगरूळ, अमोना, शेळगाव आटोळ, कोनड, पिंपळवाडी, मिसाळवाडी, देऊळगाव घुबे, तेल्हारा, एकलारा या गावातील निराधार योजनेचे सुमारे ५५५ लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम देण्यात येते. त्यानुषंगाने तहसीलमार्फत चेक क्रमांक ४२६६५३ द्वारे २७८ लाभार्थ्यांचे १ लाख ४३ हजार २00, चेक क्र.४२६८५५ द्वारे १५९ लाभार्थ्यांचे ९५ हजार ४00 आणि चेक क्र.५४७४६६ द्वारे ११८ लाभार्थ्यांंचे २३ हजार ६00 रुपये असे एकूण २ लाख ६३ हजार २00 रुपयांचे तीन चेक बँकेच्या व्यवस्थापकाने परत केल्याने निराधारांना अनुदान मिळण्यास विलंब होत आहे. या लाभार्थ्यांना अनुदानाची रक्कम घेण्यासाठी चिखली येथे ये-जा करण्यासाठी एका वेळेला ५0 ते ७0 रुपयांचा खर्च होतो, हे विशेष.