शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

मापात पाप करणाऱ्यांची संख्या शतकपार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 14:28 IST

एप्रिल २०१९ पासून आजपर्यंत वजनमापे व पॅकींगच्या वस्तूमध्ये गोलमाल करून ग्रहाकांची फसवणूक करणाºयांना सात लाख ५१ हजार ६०० रुपये दंड करून तो वसूल करण्यात आला आहे.

- ब्रम्हानंद जाधव लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: ग्राहकांची लूट करणाऱ्यांवर वैधमापन शास्त्र यंत्रणा करडी नजर ठेवून आहे. मापात पाप किंवा इतर प्रकारे ग्राहकांची फसवणूक करणाºयांनी जिल्ह्यात शतक गाठले आहे; अशा प्रकरणामध्ये गेल्या नऊ महिन्यात वैधमापन शास्त्र यंत्रणेने सोडसात लाख रुपयांवर दंड वसूल केला आहे.२४ डिसेंबर रोजी राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जातो. ग्राहकांच्या संरक्षण व हक्काविषयी ग्राहक दिनाच्या पूर्वसंध्येला माहिती घेतली असता जिल्ह्यात वैधमापन शास्त्र यंत्रणेकडून होणाºया कारवाईचा धांदोळा समोर आला. जिल्ह्यात वैध मापन शास्त्र विभागाकडून ग्राहक जागृती अभियान राबविण्यात येते. ग्राहकाने खरेदी करताना कुठली काळजी घ्यावी, आजच्या धावपळीच्या जीवनात आपली कशी फसवणूक होते, यावरही ग्राहकांना वारंवार जागरूक केल्या जाते. परंतू तरीसुद्धा जिल्ह्यातील ग्राहक जागरूक झालेले दिसून येत नाही. अशिक्षीतच नव्हे, तर सुशिक्षीत युवकही विक्रेत्यांकडून होणाºया फसवणुकीला बळी पडत आहेत. परंतू ग्राहक जागरूक नसल्याने गेल्या वर्षभरात एकही तक्रार विभागाकडे करण्यात आलेली नाही. ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी वैध मापन शास्त्र यंत्रणेकडून वारंवार तपासणी मोहिम राबविण्यात येते. त्यासाठी जिल्ह्याच्या ठिकाणी पाच निरिक्षकही कार्यरत आहेत. एप्रिल २०१९ पासून आजपर्यंत वजनमापे व पॅकींगच्या वस्तूमध्ये गोलमाल करून ग्रहाकांची फसवणूक करणाºयांना सात लाख ५१ हजार ६०० रुपये दंड करून तो वसूल करण्यात आला आहे. जिल्ह्यात १०९ प्रकरणांमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. यातील काही कारवाई प्रत्यक्ष दुकानदारांवर करण्यात आलेली आहे. तर काही प्रकरणांमध्ये उत्पादक कंपनीलाच दंड ठोठावण्यात आलेला आहे.एक कोटी पडताळणी व मुद्रांक शुल्कवैधमापन शास्त्र अधिनिमानुसार तराजू, वजनमाप, इलेक्ट्रानिक वजनयंत्रे, तोलन/मापन उपकरणे, मापे, मीटर यांचे वार्षिक फेरपडताळणी व मुद्रांकन वर्षातून एकदा करणे कायदा व नियमानुसार बंधनकारक आहे. मुदतीमध्ये वजनमाप, वजनयंत्रे फेरपडताळणी व मुद्रांकन न केल्यास कायदेशीर कारवाई केल्या जाते. एप्रिल २०१९ पासून आजपर्यंत वैधमापन शास्त्र यंत्रणेने जिल्ह्यातून एक कोटी पाच लाख रुपये पडताळणी व मुद्रांक शुल्क वसूल केला आहे.

वैध मापन शास्त्र यंत्रणेला १५ लाखाचे ‘टार्गेट’ वजन मापे, पॅकींगमध्ये ग्राहकांची फसवणूक करणारे, मापांची पडताळणी न करणारे व ग्राहकांच्या हक्काचे उल्लंघन करणाºयांवर कारवाई करून त्यांना दंड ठोठावण्याचे निर्देश मुख्य नियंत्रण कक्ष मुंबईकडून जिल्हास्तरावरील वैधमापन शास्त्र यंत्रणेला दिलेले आहेत. त्यासाठी जिल्ह्यातील वैधमापन शास्त्र यंत्रणेला २०१९-२० या अर्थिक वर्षासाठी १५ लाख रुपये टार्गेट आहे. त्यातील ५० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे.

पथकाच्या तपासणीमध्ये पॅकिंग व वजनमापात गैरप्रकार आढळून आलेल्यांवर ताताडीने कारवाई करण्यात आलेली आहे. एप्रिल पासून १०९ प्रकरणांमध्ये दंड करण्यात आलेला आहे. ग्राहकांनी जागरूक होऊन कुठे असा गैरप्रकार आढळल्यास त्वरीत तक्रार द्यावी.- नी. रा. कांबळे,सहाय्यक नियंत्रक,वैधमापन शास्त्र, बुलडाणा.

 

टॅग्स :buldhanaबुलडाणा