शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्याची अफरातफर

By admin | Updated: July 12, 2014 00:14 IST

लोणार तालुक्यातील प्रकार, पोत्यामागे पाच किलो धान्याची घट.

लोणार : गोरगरिबांना अल्प दरात स्वस्त धान्य उपलब्ध होण्यासाठी शासनाने स्वस्त धान्य वितरण प्रणाली कार्यान्वित केली; मात्र शासनाकडून वाट पासाठी येणार्‍या ५0 किलो धान्याच्या पोत्यातून ४ ते ५ किलो धान्याची अफरातफर करून तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना नियमापेक्षा कमी धान्यपुरवठा गोदामपालकाकडून होत आहे.अन्नधान्यापासून कोणताही घटक वंचित राहू नये, याकरिता शासनाने अन्नपूर्णा, अंत्योदय, अन्न सुरक्षा आदी योजना कार्यान्वित आहेत. याअंतर्गत गहू २ रुपये, तांदूळ ३ रुपये, ज्वारी १ रुपया किलोप्रमाणे उपलब्ध करून दिली. गोरगरीब शेतमजुरांसाठी या योजना जीवनदायी ठरल्याने योजनेचा लाभ हजारो लाभार्थी घेत आहेत. शासनाकडून तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना वाटपासाठी गहू, तांदूळ, ज्वारी आदीचे ५0 किलोचे पोते येथील धान्य गोदामावर उतरविण्यात येतात. गेल्या काही महिन्यांपासून येथील स्वस्त धान्याचे शासकीय गोदाम पालक कैलास सोनुने हे पुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आशीर्वादाने गत कित्येक महिन्यांपासून शासनाकडून प्राप्त होणार्‍या स्वस्त धान्याच्या ५0 किलोच्या पोत्यातून ४ ते ५ किलो धान्याची अफरातफर करीत आहेत. यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना नियमाप्रमाणे अन्नधान्याचे वाटप न होता अपुरा धान्यसाठा मिळतो. स्वस्त धान्य दुकानदारांकडून योजनेतील लाभार्थ्यांना पूर्ण धान्याचे वाटप होत नाही. शासकीय नियमाप्रमाणे तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांना स्वस्त धान्याचे वाटप न करणार्‍या गोदामपालकाच्या मनमानी कारभाराला कंटाळून अनेक वेळा तक्रारी केल्या. तरीसुद्धा याबाबत कोणतीही दखल घेतल्या गेलेली नाही. गोदामपालक हे स्वस्त धान्य दुकानदारांना नियमाप्रमाणे मालाचे वाटप करीत नाही. अन्नधान्य वाटपाच्या दिवशी लहान दुकानदारांकडून ५00 रु पये, तर मोठय़ा दुकानदारांकडून १000 रुपये घेतल्याशिवाय माल वाटप करीत नाहीत. पुरवठा निरीक्षकअजय पिंपरकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी गोदामपालकाकडून स्वस्त धान्य दुकानदारांना शासकीय नियमापेक्षा कमी अन्नधान्याचा पुरवठा होणे ही गंभीर बाब असल्याचे मान्य करून सदर प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळल्यास कारवाई करण्यात येईल, असे सांगीतले.*धान्य न मोजताच वाटपप्रत्येक महिन्याला शासकीय धान्य गोदामातून स्वस्त धान्य दुकानदारांना इलेक्ट्रॉनिक्स काट्याद्वारे मोजून स्वस्त धान्याच्या मालाचे वाटप करण्याचे आदेश आहेत. तरीसुद्धा गोदाम पालकाकडून दुकानदारांना काटा न करता मालाचे वाटप करण्यात येते. गत २ वर्षांपासून गोदामातील इलेक्ट्रानिक्स काटा बंद पडला आहे.