शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्त धान्याची काळ्या बाजारात विक्री!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:26 IST

बुलडाणा/खामगाव : जिल्ह्यात स्वस्त धान्याचा काळाबाजार फोफावला असून, ऐन सणासुदीच्या दिवसात स्वस्त धान्य दुकानांऐवजी धान्याची काळ्या बाजारात विक्री होत आहे. मेहकर तालुक्यातील ६५ दुकानांमध्ये स्वस्त धान्य पोहोचले नसून, शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे. दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी खामगाव येथील पोलीस कारवाईत जप्त केलेला २0 टन तांदूळ ताब्यात घेण्यासाठी पत्र पाठविले आहे.गत काही महिन्यांपासून जिल्ह्यात स्वस्त धान्याचा काळाबाजार होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.

ठळक मुद्देतांदळाचा काळाबाजार जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांचे तहसीलदारांना पत्र 

लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा/खामगाव : जिल्ह्यात स्वस्त धान्याचा काळाबाजार फोफावला असून, ऐन सणासुदीच्या दिवसात स्वस्त धान्य दुकानांऐवजी धान्याची काळ्या बाजारात विक्री होत आहे. मेहकर तालुक्यातील ६५ दुकानांमध्ये स्वस्त धान्य पोहोचले नसून, शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्यापासून वंचित राहावे लागणार आहे. दरम्यान, जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी खामगाव येथील पोलीस कारवाईत जप्त केलेला २0 टन तांदूळ ताब्यात घेण्यासाठी पत्र पाठविले आहे.गत काही महिन्यांपासून जिल्ह्यात स्वस्त धान्याचा काळाबाजार होत असल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. सध्या सुणासुदीचे दिवस असून, आगामी काळात गणेश उत्सव, दुर्गा देवी उत्सव, दसरा व दिवाळी आहे. या दिवसांमध्ये शिधापत्रिकाधारकांना स्वस्त धान्याचा पुरवठा करण्याऐवजी काळ्या बाजारात धान्याची विक्री होत आहे. गत एक महिन्यात जिल्ह्यातील अनेक स्वस्त धान्य दुकानदारांना धान्य मिळाले नाही. दुकानदारांसह शिधापत्रिकाधारकांनाही धान्यापासून वंचित राहावे लागत आहे. दरम्यान, काळ्या बाजारात जाणारा २0 टन रेशनचा पोलिसांनी पकडलेला तांदूळ तत्काळ ताब्यात घ्या, असे आदेश जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी खामगाव तहसीलदारांना दिल्याचे खात्रीलायक वृत्त हाती आले आहे. या संपूर्ण प्रकरणात दस्तुरखुद्द जिल्हाधिकार्‍यांनी लक्ष घातल्याने, रेशनमाफीयांचे धाबे दणाणले आहे.जिल्ह्यात स्वस्त धान्य वितरणात अनियमिततेच्या गेल्या तीन महिन्यांमध्ये सात घटना उघडकीस आल्या आहेत. यामध्ये खामगाव येथे घडलेली घटना ताजी असून, या संपूर्ण प्रकाराकडे जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांकडून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचा प्रथमदर्शनी अंदाज जिल्हाधिकार्‍यांनी काढला आहे. त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांना धारेवर धरण्यात आल्यानंतर, मंगळवारी जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी हालचालीस वेग देत, खामगाव येथे पकडण्यात आलेला तांदूळ ताब्यात घेण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत. यासंदर्भात जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयामार्फत खामगाव येथील तहसीलदारांना पत्रव्यवहारही करण्यात आला. दरम्यान, मंगळवारी दुपारी या प्रकरणात वेगाने घडामोडी घडल्याची खात्रीलायक माहिती आहे. यासंदर्भात खामगाव तहसीलदार सुनील पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, खामगाव पोलिसांचे पत्र मिळाल्यानंतर त्यांना प्रस्ताव सादर करण्यात आल्याची माहिती दिली; मात्र जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांचे पत्र प्राप्त झाले नसल्याचे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.

काळ्या बाजारात तांदूळ विकण्याच्या घटनांमध्ये वाढ!२२ जून रोजी अमडापूरकडे जाणारा एमएच-१९-२0९७ या दहाचाकी ट्रकमधून  ३५0 कट्टे तांदूळ जप्त करण्यात आला होता. २२ जुलै रोजी बुलडाणा जिल्ह्यातील धाड येथे १0२ कट्टे तांदूळ पकडण्यात आला होता. येथील स्वस्त धान्य दुकानदाराचे रेकॉर्डही जप्त करण्यात आले होते, तर ५ जुलै रोजी चिखली येथून ११0 कट्टे,  तर ३ एप्रिल रोजी नांदुरा येथे १८४ कट्टे तांदूळ तहसीलदारांनी जप्त केला होता. त्याचप्रमाणे आता खामगाव येथे २0 टन तर बुलडाणा येथे  ७२ कट्टे तांदूळ पकडण्यात आला. तर शेगाव येथेही मोठय़ा प्रमाणात रेशनचा तांदूळ पकडण्यात आला होता.

वाहतूक नियमांना हरताळ!गेल्या तीन महिन्यात जप्त करण्यात आलेल्या तांदळाची वाहतूक ही शासनाने अधिग्रहित केलेल्या वाहनांतून केली जात असली तरी, या ट्रकवर कोठेही ‘सार्वजनिक वितरण प्रणाली’ तसेच संबंधित वाहनांचा रंगही हिरवा नव्हता. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांमध्ये पकडण्यात आलेला सर्व तांदूळ हा काळ्या बाजारात जात असल्याची चर्चा आहे.

खामगाव पोलिसांच्या पत्रांवर कारवाई!खामगाव येथे तांदूळ पकडण्यात आल्यानंतर खामगाव पोलिसांनी सोमवारी जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी यासंदर्भात पुढील कारवाईसाठी पत्र दिले होते. या पत्रानुसार जिल्हा पुरवठा अधिकार्‍यांनी पकडण्यात आलेला २0 टन तांदूळ ताब्यात घेण्यासाठी मंगळवारी तहसीलदारांना पत्र दिले आहे.

पालकमंत्री लक्ष देतील काय? जिल्ह्याचे पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी गुरुवारी बुलडाण्यात येणार आहेत. गरिबांचे धान्य काळ्या बाजारात विकण्याचा मुद्दा सध्या जिल्ह्यात गाजत आहे. पालकमंत्र्यांनी याकडे लक्ष देऊन संबंधीतांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश द्यावे, अशी मागणी होत आहे.