शहरं
Join us  
Trending Stories
1
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
2
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
3
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
4
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
5
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
6
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
7
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
8
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
9
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
10
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
11
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
12
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
13
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
14
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
15
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
16
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
17
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
18
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
19
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
20
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

जातीय राजकारणाला चपराक

By admin | Updated: May 17, 2014 23:01 IST

बुलडाणा जिल्ह्यात आगामी काळात आघाडीच्या आमदारांना इशारा आहे.

बुलडाणा: लोकसभा निवडणुकीच्या इतिहासाचा मागोवा घेतला तर आतापर्यंत कुणालाही इतके मते मिळाली नाही जितकी या निवडणुकीत प्रतापराव जाधव यांनी खिशात टाकली. मतांचे हे भरघोस पीक येण्यासाठी ह्यमोदीह्ण नावाचे खत कारणीभूत ठरले, यात कुणालाही शंका नाही. जातीपातीचे समीकरण मांडून विजयाची गणिते मांडणार्‍या राजकीय प्रवृत्तींनाही आजचा निकाल म्हणजे मोठी चपराक आहे. लोकांची मते बदलतात, ते बोलत नाहीत तर ह्यइव्हीएमह्णमधून प्रगट होतात, हेच या निकालाने दाखवून दिले आहे. लोकसभा निवडणूक निकालाच्या याच पृष्ठभूमीवर विधानसभा निवडणुकांची गणिते मांडली तर सध्याच्या प्रत्येक मतदारसंघातील आमदारांची ताकद व क्षमता उघडी पडली आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीचे गड समजल्या जाणार्‍या तीनही मतदारसंघात शिवसेनेचा भगवा ज्या डौलाने फडकत आहे ते पाहता हा आगामी काळात आघाडीच्या आमदारांना इशारा आहे. या विजयामुळे युतीच्या आमदारांनाही हुरळून जाण्याची गरज नाही, कारण गेल्या निवडणुकीची तुलना केली तर आता मिळालेला लिड हा केवळ मोदी फॅक्टरचा असल्यामुळे तो टिकवून ठेवण्याची मोठी कसरत त्यांना करावी लागणार आहे.

**काँग्रेसच्या तंबुत घबराट

    आ.दिलीपकुमार सानंदा यांच्या प्रभावाखालील खामगावात गेल्यावेळी शिवसेनेने लिड घेतला होता, यावेळी तर आघाडी धर्माच्या मुद्यावर रान उठवून आ.सानंदा यांनी मेरी मर्जी चलेगी, हे दाखवून दिले तरीही शिवसेनेने २६ हजारावर लिड घेतला. मूळचा भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या खामगावात यावेळी लोकांनी मते बदलवली आहेत ती तशीच कायम राहिली तर नव्या परिवर्तनाचे आकाश मोकळे होईल. असाच प्रकार चिखलीत आ.राहुल बोंद्रे यांच्या प्रती आहे. काँग्रेसमध्येच गटबाजी असून आ.बोंद्रे यांच्या एकतंत्री कारभाराचे पडसाद मतदारसंघात उमटतात, त्यामुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजधानी असलेल्या चिखलीत तरी हे पडसाद धोक्याच्या घंटेत रूपांतरीत होतील.

**आ.डॉ.शिंगणे यांना डबल धक्का

राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील एकमेव दमदार नेतृत्व असलेले आ.डॉ.राजेंद्र शिंगणे यांना सतत धक्के बसत आहेत.निकालाच्या पुर्वसंध्येलाच त्यांच्या नावाने ओळखल्या जाणारी जिल्हा बँक अवसायनात निघाली व दुसर्‍या दिवशी सिंदखेडराजा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे ३१ हजाराचा लिड सेनेला मिळाला. आ.शिंगणे यांचे पक्षासोबत ताणलेले संबंध सुरळीत झाले नाहीत. बँकेला शेवटपर्यंत मदत मिळाली नाही तर ज्या स्वाभिमानाने त्यांनी राजीनामा भिरकावत लोकसभेची उमेदवारी नाकारली तोच प्रकार विधानसभेत होण्याची शक्यता नाकारता येत नाही, याचे उत्तर काळच देईल; मात्र सध्या तरी सिंदखेडची नगरपालिकाही गेली, सेनेची ताकद वाढली याचाच धक्का मोठा आहे व तो वाढू शकतो. या मतदारसंघात मिळालेला लिड हा मोदीच्या नावाने खपला गेला आहे.