शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

वीज मीटरमध्ये फेरफार केल्यास होऊ शकतो घरात कायमचा अंधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2021 04:36 IST

महावितरणकडून मुंबई वगळता राज्यभरात घरगुती, वाणिज्यिक, औद्याेगिक व कृषी ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. वीज वापराच्या मोजमापासाठी ग्राहकांच्या घरात ...

महावितरणकडून मुंबई वगळता राज्यभरात घरगुती, वाणिज्यिक, औद्याेगिक व कृषी ग्राहकांना वीज पुरवठा केला जातो. वीज वापराच्या मोजमापासाठी ग्राहकांच्या घरात मीटर बसविले जाते. मीटर रीडिंगनुसार वीज बिलाची आकारणी केली जाते. काही ग्राहक वीज बिल चुकविण्यासाठी चक्क मीटरमध्येच फेरफार करतात. नंतर वीजचोरी पकडली गेल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. भारतीय विद्युत कायद्याच्या कलम १३५, १३८ व १२६ अंतर्गत गुन्हा दाखल करून वीजचोरी करणाऱ्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल केला जाऊ शकतो.

मीटर जप्ती व मोठा दंड

वीजचोरी करणे कायद्याने गुन्हा आहे. एखाद्या ग्राहकाकडे वीजचोरी पकडली गेल्यास त्याला चुकविलेल्या वीज बिलाची रक्कम, दंड व तडजोडीची रक्कम भरण्याचा पर्याय देण्यात येतो. तो स्वीकारल्यास अशा ग्राहकाचा वीजपुरवठा पुन्हा बहाल केला जाऊ शकतो. तथापी, तडजोडीचा प्रस्ताव स्वीकारला नाही, तर मीटर जप्त करून कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाते.

कधीही होऊ शकते मीटरची तपासणी

विद्युत चोरीला आळा घालण्यासाठी महावितरणची पथके सदैव दक्ष असतात. एखाद्या ठिकाणी वीजचाेरी होत असल्याची शंका आल्यास किंवा कुणी गुप्त माहिती दिल्यास ही पथके संबंधित व्यक्ती, उद्योग अथवा व्यावसायिक प्रतिष्ठानावर छापा टाकून मीटरची तपासणी करू शकतात.

वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्याविरुद्ध कारवाई

२०२० आणि २०२१ या वर्षात वीज मीटरमध्ये फेरफार करणाऱ्या ७२४ जणांविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये एक कोटी पाच दहा हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

वीजचोरी हा कायद्याने गुन्हा असून, त्यासाठी शिक्षेची तरतूदही आहे. मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळल्यास अशा ग्राहकांविरुद्ध कारवाई केली जाऊ शकते.

- विकास बांबल, व्यवस्थापक, वित्त व लेखा, महावितरण.