शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गावर ‘चक्का जाम’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 00:56 IST

खामगाव :  शहरानजीकच्या टेंभूर्णा फाट्यावर १४ ऑगस्टला शेतकरी कर्जमुक्तीसाठीच्या दुसर्‍या टप्प्यातील आंदोलनास सुरुवात करताना सुकाणू समितीच्यावतीने ‘चक्का  जाम’ करण्यात आला. या आंदोलनामुळे तब्बल तीन तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.

ठळक मुद्दे खा.राजू शेट्टी यांचे नेतृत्व जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांचा सहभागरस्त्यावरच खाल्ल्या आंदोलकांनी भाकरी

लोकमत न्यूज नेटवर्कखामगाव :  शहरानजीकच्या टेंभूर्णा फाट्यावर १४ ऑगस्टला शेतकरी कर्जमुक्तीसाठीच्या दुसर्‍या टप्प्यातील आंदोलनास सुरुवात करताना सुकाणू समितीच्यावतीने ‘चक्का  जाम’ करण्यात आला. या आंदोलनामुळे तब्बल तीन तास राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती.आंदोलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणूक काळात दिलेले आश्‍वासन न पाळल्याने त्यांनी शेतकर्‍यांची फसवणूक केली असल्याचा आरोप शेतकरी नेते खा.राजू शेट्टी यांनी केला. शेतकर्‍यांची विनाअट सरसकट कर्जमाफी व स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे शेतमालास भाव देण्याच्या प्रमुख मागणीसाठी सुकाणू समितीच्यावतीने दुसर्‍या टप्प्यातील आक्रमक आंदोलनास सोमवार १४ ऑगस्टपासून सुरुवात करण्यात आली. या अंतर्गत टेंभूर्णा फाट्यावर खा.राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष ना.रविकांत तुपकर, सुकाणू समितीचे निमंत्रक कॉ.दादा रायपुरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे, जितेंद्र चोपडे, राणा चंदन, रवी महाले आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी मार्गदर्शन करताना खा.शेट्टी म्हणाले की, आपण कृषिमंत्र्यांना पत्र लिहून प्रश्न विचारणार आहोत की, मोदी यांनी निवडणुकीत फक्त शेतकर्‍यांची मते मिळविण्यासाठी खोटी आश्‍वासने दिलीत की, शेतकर्‍यांचे प्रश्न त्यांना कळलेलेच नाहीत. या दोनपैकीच एक खरे असू शकते. मोदी यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात गुजरातमध्ये शेतीची प्रगती झाली म्हणून ते देशातही शेती व शेतीला प्रगतीपथावर  नेतील, असे वाटले होते; पण त्यांनी शेतकर्‍यांचा विश्‍वासघात केला. त्यामुळे आम्ही आता तुम्हाला सोडणार नाही, असा गर्भित इशाराही शेट्टी यांनी दिला. आम्ही आमचा हक्क मागतोय. तुम्ही तीन वर्षांपासून आश्‍वासन पाळले नाही म्हणून आम्ही कर्जबाजारी झालोय. आमच्या न्याय्य हक्कांसाठी आता सर्वांशी दोन हात करण्याची आमची तयारी आहे. एनडीएच्या एवढय़ा जागा आल्यात त्या केवळ शेतकर्‍यांमुळेच. शेतकर्‍यांचे प्रेम तुम्ही पाहिलेत आता त्यांचा रागही पाहा, असे ते म्हणाले. यावेळी ना. रविकांत तुपकर म्हणाले की, शेतकरी कर्जमाफीची भीक मागत नसून तो त्यांचा हक्क आहे. या कर्जमाफीच्या मागणीला सैद्धांतिक अधिष्ठान आहे. शासनाकडून अपेक्षाभंग झाल्याने त्याच्याविरुद्ध लढा देण्याची वेळ आली. सरकारविरुद्धची खरी लढाई आता सुरु झाली आहे. शेतकर्‍यांसाठी ‘करो या मरो’ची स्थिती उत्पन्न झालेली आहे. त्यामुळे आता सत्तेची गुर्मी व मस्ती उतरवल्याशिवाय राहणार नाही, असे ते म्हणाले.या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक तब्बल तीन तास खोळंबली होती. परिणामी, वाहनांच्या लांबलचक रांगा लागल्या. पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला होता. 

रस्त्यावरच खाल्ल्या आंदोलकांनी भाकरीआंदोलनाच्या शेवटी आंदोलनकर्त्या शेतकर्‍यांनी सोबत आणलेल्या ठेचा- भाकरी  रस्त्यावर बसून खाल्ल्या. यावेळी खा.राजू शेट्टी, ना. रविकांत तुपकर आदींनीसुद्धा ठेचा -भाकर खावून शेतकर्‍यांना साथ दिली. यावेळी सुमारे एक हजारपेक्षा जास्त शेतकरी उपस्थित होते.