शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

बेलाड ग्रामपंचायतीत सरपंच-सचिवांच्या खुर्च्या पळवल्या..!!

By सदानंद सिरसाट | Updated: March 16, 2024 15:09 IST

सदस्यांचा गदारोळ : गणपूर्तीअभावी ग्रामसभा तहकूब

मलकापूर (बुलढाणा) : सरपंच व सचिवांच्या मनमानी कारभाराला कंटाळून संतप्त सदस्यांनी बेलाड ग्रामपंचायतीत एकच गदारोळ माजवला. १५ मार्च रोजी घडलेल्या या घटनेत सरपंच व सचिवांच्या खुर्च्या पळवण्यात आल्या. गणपूर्तीअभावी ग्रामसभा तहकूब करण्यात आली.

तालुक्यातील बेलाड ग्रामपंचायतीत गेल्या अनेक दिवसांपासून सत्ताधारी व विरोधी ग्रामपंचायत सदस्यांमध्ये सरपंच व सचिवांच्या मनमानी कारभाराबाबत असंतोष खदखदत आहे. ही बाब १५ मार्च रोजी ग्रामसभेच्या माध्यमातून पुढे आली. ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांनी गत काळात जनहिताची कामे केली आहेत. त्याची देयके देण्यासाठी टाळाटाळ केली जात असल्याने वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराला आजवर विरोधी सदस्यांचा विरोध होता. आता मात्र त्यात सत्ताधाऱ्यांची भर पडल्याने वाद उपस्थित झाला आहे.

१५ मार्च रोजी ग्रामसभा आयोजित केली होती. यावेळी सरपंच अनुपस्थित होते तर सचिव तथा ग्रामसेवक उपस्थित होते. यावेळी विकासकामांना सोडून ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत केलेल्या कामांच्या देयकावरच सदस्यांनी गदारोळ माजवला. तर संतप्त सदस्यांनी चक्क सरपंच व सचिवांच्या खुर्च्या पळवल्याने एकच खळबळ उडाली. दरम्यान, गणपूर्तीअभावी बेलाड ग्रामपंचायतीची ग्रामसभा तहकूब करण्यात आली.- गटविकास अधिकाऱ्यांचे कानावर हात..!

बेलाड ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत संताप सदस्यांनी गदारोळ माजवला. कामांच्या देयकांसाठी चक्क खुर्च्या पळवल्या. हा प्रकार काहींनी गटविकास अधिकारी उद्धव होळकर यांना कळवला. मात्र, त्यांनी नेहमीप्रमाणे कानावर हात ठेवल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्यांनी दिली आहे.प्रकृती बरी नसल्याने मला ग्रामसभेला जाता आले नाही. ग्रामपंचायतीचा कारभार पारदर्शकपणे केला जातो. वास्तविक कुठल्याही सदस्याची किंवा ग्रामस्थांची समस्या असेल तर त्यावर गावपातळीवर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न होऊ शकतात. त्या विषयावर बाहेर चर्चा व्हायला नको.- सचिन संबारे, सरपंच, बेलाडग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी विकासकामांऐवजी देयकांच्या विषयावरून सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. सदस्य खुर्च्या त्यांच्या घरी घेऊन गेले. यावेळी विनंती केली पण त्यांनी ऐकले नाही.- राधेश्याम मादनकर, ग्रामसेवक, बेलाड