बुलडाणा: केंद्र सरकारचे दोन सदस्यीय पथक बुलडाणा जिल्ह्यातील कोरोना संसर्गाच्या स्थितीचा आढावा घेण्यासोबतच अनुषंगीक उपाययोजना करण्याच्या तथा सुचविण्याच्या दृष्टीने बुलडाणा जिल्ह्यात दाखल झाले आहे.या पथकाने जिल्हाधिकारी कार्यालयात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून आढावा घेतला आहे. दरम्यान, जिल्ह्यात प्रत्यक्ष फिरून हे पथक एकंदरीत स्थितीचा आढावाही घेणार आहे. दरम्यान पथक स्वत:च निर्णय घेवून नेमक्या कोणत्या ठिकाणी भेटी द्यावयाच्या आहेत हे निश्चित करले. त्यामुळे जिल्ह्यातील स्थानिक अधिकाऱ्यांच्या या केंद्राच्या दोन सदस्यीय पथकाच्या दौऱ्यामध्ये फारसा हस्तक्षेप राहणार नसल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ सुत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
केंद्राचे दोन सदस्यीय पथक बुलडाणा जिल्ह्यात दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 12:53 IST