शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थ्याच्या आत्महत्याप्रकरणी महाविद्यालयाच्या अध्यक्षाविरुद्ध गुन्हा दाखल

By admin | Updated: August 20, 2016 02:31 IST

मोताळा तालुक्यातील घटना; शिष्यवृत्तीचे पैसे देण्यास महाविद्यालयातील संबधितांनी केली होती टाळाटाळ.

धामणगाव बढे (जि.बुलडाणा), १९ : मोताळा तालुक्यातील कुर्‍हा येथील संजय मधुकर तायडे (२७) या विद्यार्थ्याने १७ ऑगस्ट रोजी कुर्‍हा येथे आत्महत्या केली. तपासात मृतक विद्यार्थ्यांंने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना मिळाली असून, त्यात आत्महत्येस प्रवृत्त करणार्‍या तीन व्यक्तींची नावे लिहून ठेवली. त्या आधारे शेगाव येथील सरस्वती महाविद्यालयाचे अध्यक्ष शरद शिंदे, कळमसरे बाबु, गौरव कोरेगावकर या तिघांविरूद्ध १९ ऑगस्ट रोजी गुन्हा दाखल केला. मृतक विद्यार्थी संजय मधुकर तायडे हा शेगाव येथे सरस्वती महाविद्यालयात तीन वर्षांंपासून एमसीएचे शिक्षण घेत होता. त्यास मिळणार्‍या शिष्यवृत्तीचे पैसे देण्यास महाविद्यालयातील संबधितांनी टाळाटाळ करून त्यास त्रस्त केले होते. या प्रकारास वैतागून संयजने कुर्‍हा येथे घरामध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. तत्पूर्वी त्याने चिठ्ठीमध्ये संबंधित आरोपींची नावे लिहून ठेवली होती. या प्रकरणी विद्यार्थ्याचा भाऊ प्रभाकर मधूकर तायडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून शरद शिंदे, कळमसरे बाबु, गौरव कोरेगावकर या तिघांविरूद्ध धामणगाव बढे पोलिसांनी कलम ३0६, ३४ भादंविनुसार गुन्हा दाखल केला.