शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १० केंद्रांमध्ये हाेणार काेराेना लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:29 IST

बुलडाणा : काेराेना लसीकरणास देशभरात १६ जानेवारीपासून सुरुवात हाेणार आहे. त्यादृष्टीने आराेग्य विभागाने जिल्ह्यात लसीकरण माेहीम राबविण्याची तयारी पूर्ण ...

बुलडाणा : काेराेना लसीकरणास देशभरात १६ जानेवारीपासून सुरुवात हाेणार आहे. त्यादृष्टीने आराेग्य विभागाने जिल्ह्यात लसीकरण माेहीम राबविण्याची तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यात १० केंद्रांवर लसीकरणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

देशभरात काेराेना लसीकरण १६ जानेवारीपासून सुरू हाेणार असल्याची घाेषणा केंद्र सरकारने केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातही आराेग्य यंत्रणेने लसीकरणाची तयारी पूर्ण केली आहे. पहिल्यात टप्प्यात आरोग्य विभागातील १३,५०० फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना १० केंद्रांवर ही लस देण्यात येणार आहे.

प्रत्यक्ष लसीकरणाच्या मोहिमेत कुठलीही अडचण येऊ नये या दृष्टिकोनातून लसीकरणाची ८ जानेवारी रोजी रंगीत तालीम करण्यात आली हाेती. लसीकरणासाठी प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्ष अशी त्रिस्तरीय रचना करण्यात येणार आहे. नोंदणीकृत लाभार्थीच्या मोबाइल क्रमांकावर लसीकरण तारीख, वेळ व ठिकाणचा मॅसेज पाठविण्यात येणार आहे. लसीकरणासाठी जिल्ह्यातील दहा केंद्राची निवड करण्यात आली असून, तेथे तयारीही पूर्ण करण्यात आली आहे. आराेग्य विभागाची तयारी पूर्ण झाली असली तरी अद्याप लस काेणती देण्यात येणार, याविषयीची माहिती आराेग्य विभागाला मिळालेली नाही.

या केंद्रात हाेईल लसीकरण

जिल्ह्यातील शेगाव, खामगाव, मलकापूर, बुलडाणा, चिखली, देऊळगावराजा, मेहकर, साेनाळा, सुलतानपूर आणि नांदुरा येथे आराेग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. त्याविषयीची तयारी आराेग्य विभागाच्या पूर्ण झाली आहे.

१३,५००

आराेग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस

आराेग्य विभागातील कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस देण्यात येणार आहे. त्यासाठी दहा केंद्रांची निवड करण्यात आली असून, तयारी पूर्ण करण्यात आली आहे. लस कुठली येणार तसेच कधी येणार याविषयी माहिती मिळालेली नाही.

डाॅ. नितीन तडस, जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा