शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

खामगाव बाजारपेठेतील मुख्य मार्गावर मालवाहू वाहने; चौकांमध्ये वाहतुकीचा खोळंबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 14:40 IST

खामगाव: शहरातील  बाजारपेठेतील  मुख्य मार्गावर अनेक व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. या दुकानांना लागत असलेला माल उतरविण्यासाठी दररोज मुख्य मार्गावर मालवाहू वाहने तासनतास उभी असतात. परिणामी चौका-चौकांमध्ये वाहतुकीचा खोळंबा नित्याचाच झाला आहे. 

ठळक मुद्देदुकानांना लागत असलेला माल उतरविण्यासाठी दररोज मुख्य मार्गावर मालवाहू वाहने तासनतास उभी असतात.शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या दुकानांपुढे नेहमीच दुचाकी वाहनांची गर्दी असते.वाहतुकीची कोंडी ही समस्याही नवीन राहिलेली नसली तरी त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. 

खामगाव: शहरातील  बाजारपेठेतील  मुख्य मार्गावर अनेक व्यापारी प्रतिष्ठाने आहेत. या दुकानांना लागत असलेला माल उतरविण्यासाठी दररोज मुख्य मार्गावर मालवाहू वाहने तासनतास उभी असतात. परिणामी चौका-चौकांमध्ये वाहतुकीचा खोळंबा नित्याचाच झाला आहे. 

येथील मार्केट परिसरात कुठेही वाहनतळ नाही. त्यामुळे दुचाकीचालकांना वाहने ठेवताना नेहमीच अडचणी येतात. शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या दुकानांपुढे नेहमीच दुचाकी वाहनांची गर्दी असते. त्यातच लहान-लहान मालवाहू वाहने या दुकानांमध्ये माल उतरविण्यासाठी दिवस दिवस वाहने उभी करून ठेवतात. त्यामुळे अर्धा रस्ता व्यापला जातो. तसेच माल दुकानांमध्ये उतरविण्याचा प्रकार अनेक दुकानांमध्ये दिवस भर सुरू असतो. शुक्रवारी गांधी चौकात असलेल्या दुकानांसमोर दुपारी माल उतरवित असलेल्या वाहनांची रांग लागली होती. त्यामुळे बराच वेळ येथे वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी नागरिक संताप व्यक्त करीत होते. 

दुकानांपुढे असलेल्या मोकळ्या जागेत ही वाहने उभी करून माल उतरविणे खरे तर गरजेचे आहे. पण अत्यल्प असलेल्या जागेतील अर्ध्या भागात आधीच दुकानांनी अतिक्रमण केले आहे. उरलेल्या जागेवर ग्राहकांची आणि दुकान मालकासह काम करीत असलेल्या कर्मचारी वगार्ची वाहने उभी असतात. त्यामुळे मालवाहू वाहनांना रस्त्यावर वाहने उभी करूनच माल उतरवावा लागतो. एखाद्या दुकानापुढे मोकळी जागा असली तरीही वाहनचालक सोयीच्या दृष्टीने रस्त्यावरच गाडी उभी करतो. वाहतुकीवर काय परिणाम होत आहे याचा विचारच केला जात आहे. हा प्रकार शहरात नित्याचाच झाला आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी ही समस्याही नवीन राहिलेली नसली तरी त्यामुळे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. 

अश्या प्रकारे रस्त्यावर उभ्या मोठ्या वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करणे गरजेचे आहे. तसेच दुकानदारांसोबत बोलून सकाळी लवकर माल उतरवून घेण्यासंबंधी त्यांना सुचविणे गरजेचे आहे. आपली वाहने कमी कमी रस्त्यावर येईल याची काळजी घेणे गरजेचे आहे. पण मालवाहू वाहनचालकांकडून याची कोणतीही खबरदारी घेतली जात नाही. दुपारी मुख्य मार्गावर जास्त वर्दळ असते. अशावेळी वाहतुकीची कोंडी होऊन अपघाताची शक्यता ही बळावली असून याकडे लक्ष देणे गरजेचे झाले आहे.( प्रतिनिधी)

मालवाहू वाहने भर रस्त्यात उभी 

 दुपारच्या वेळेत शहरातील अकोला बाजार, भुसावळ चौक या मुख्य मार्गावर वाहनांची वर्दळ असते. त्यातच अर्ध्या रस्त्यापर्यंत मालवाहू वाहने साहित्य उतरविण्यासाठी बराच वेळ उभी असतात. परिणामी वाहतुकीचा खोळंबा होतो. त्यातच हा मार्ग लहान लहान चौकांनी विभागला गेला आहे. त्यामुळे वाहने सतत चौकाचौकातून वळत असतात. त्यामुळे अपघाताची शक्यता बळावली आहे. किरकोळ अपघात नेहमीच होत असतात. 

टॅग्स :khamgaonखामगावMarketबाजार