शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

काेराेनामुळे टाळ, वीणा, पखवादाचा निनाद थांबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:36 IST

किनगाव जट्टू : गतवर्षीपासून कोरोना संसर्ग आजाराने शहरी भागासह ग्रामीण भागातसुद्धा थैमान घातल्याने त्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या ...

किनगाव जट्टू : गतवर्षीपासून कोरोना संसर्ग आजाराने शहरी भागासह ग्रामीण भागातसुद्धा थैमान घातल्याने त्या पार्श्वभूमीवर शासनाने लागू केलेल्या संचारबंदीमुळे धार्मिक, सामाजिक, राजकीय कार्यक्रम बंद आहेत. यामध्ये कीर्तन, प्रवचन, अखंड हरिनाम सप्ताह, हरिपाठ, इतर धार्मिक कार्यक्रम बंद आहेत. त्यामुळे टाळ, वीणा, पखवाजाचा निनाद थांबला आहे.

वारकरी संप्रदायाची भगवी पताका खांद्यावर घेऊन महाशिवरात्रीपासून गावोगावी अखंड हरिनाम सप्ताहाची अनेक वर्षांची परंपरा आहे. परंतु गत वर्षीपासून कोरोना संसर्ग आजाराने थैमान घातल्यामुळे तो आजार रोखण्यासाठी शासनाच्या वतीने धार्मिक कार्यक्रम स्थगित करण्यात आले आहेत. एकादशीनिमित्त चालणारे गावोगावी सामूहिक, भजन, कीर्तन, प्रवचन तसेच दररोज सायंकाळी मंदिरांमध्ये सामूहिक हरिपाठ, उपासना चालत असतात. याला टाळ, वीणा, पखवादाची साथ असते. मात्र, कोरोना संसर्गाच्या भीतीने लागू असलेल्या संचारबंदीमुळे हा निनाद थांबला आहे. मार्च महिन्यापासून हरिनाम सप्ताह, यात्रा, मेळावे, उत्सव मोठ्या प्रमाणात चालू होतात. या काळात गावोगावी हरिनाम सप्ताहाची संख्या मोठ्या प्रमाणात असते. कीर्तनकार, पखवावादक वीणेकरी, चोपदार, टाळकरी, प्रवचनकारही या दिवसांत व्यस्त राहतात. परंतु गतवर्षीपासून कोरोनामुळे संचारबंदी, कधी लॉकडाऊन चालूच आहे. यामुळे सर्व सामूहिक धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. लोकांची गर्दी टाळण्यासाठी कीर्तनकार, प्रवचनकार कुठेही जात नाहीत. एप्रिल-मे महिन्यात हरिनाम सप्ताहात काकडा, आरती, गाथा पारायण, भजन, कीर्तन, प्रवचन तसेच गावात स्नेहभोजन दिनक्रम चालू असतात. गावोगावी प्रत्येक एकादशीला रात्री संप्रदाय पंथाचे सामूहिक भजन, आरबडी मंडळ भजन व दुसऱ्या दिवशी द्वादशीला स्नेहभोजन, दररोज मंदिरामध्ये सायंकाळी सात वाजेच्या दरम्यान सामूहिक हरिपाठ होत असतो. त्यामुळे मंदिर परिसरात आनंदमय वातावरण निर्मित होते. चैत्र महिन्यात बऱ्याच ठिकाणी देवी संस्थानच्या वतीने यात्रा भरविण्यात येत होते. रामनवमीचा कार्यक्रमसुद्धा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत होता. भीतीने व लागू असलेल्या संचारबंदीमुळे सर्व धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम रद्द झाले आहेत. काही ठिकाणी सप्ताहाची परंपरा स्थगित होऊ नये, यासाठी तुकाराम महाराज, गाथा पारायण, ग्रंथराज ज्ञानेश्वरी, पारायण एकाच व्यक्तीने मंदिरामध्ये बसून त्या तिथीवर केले आहे.