हिवरा आश्रम (जि. बुलडाणा): मेहकर-चिखली रोडवरील गजरखेड-पिंपळगाव उंडा फाट्यादरम्यान चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने कार झाडावर आदळून अपघात झाला. यामध्ये सदर गाडीतील शिक्षक गंभीर जखमी झाल्याची घटना १२ जुलै रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास घडली. मुळचे शिवाजी नगर येथील रहिवासी तर जिल्हा परीषद मराठी प्राथमिक शाळा थार बदनापूर येथे कार्यरत असलेले शिक्षक संदिप काशिनाथ वडतकर (३१) हे फोर्ड आयकाँन एम.एच.१२ सी.डी.९९७६ या कारने लव्हाळा येथून हिवरा आश्रमला येत होते. दरम्यान कारवरील नियंत्रण सुटल्याने कार रस्त्याच्या खाली उतरून झाडावर आदळली. या अपघातात संदिप वडतकर हे गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान त्यांना तात्काळ चिखली येथील एका खासगी हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. व तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारार्थ औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.
कार झाडावर आदळून एक गंभीर
By admin | Updated: July 13, 2016 02:10 IST